Google Search : कोरोना अन् Oxygen Cylinder सोबतच Google वर सर्वाधिक सर्च होतायत 'हे' शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:58 PM2021-04-22T18:58:03+5:302021-04-22T19:01:43+5:30

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव

सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात सध्या दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे.

बुधवारी देशात चोवीस तासांत ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानं ऑनलाइन सर्च पॅटर्नमध्येही मोठा फरक पाहायला मिळत आहे.

सध्या लोकं मोठ्या प्रमाणात कोरोनाशी निगडीत बाबी सर्च करत आहे. युझर्सद्वारे करण्यात आलेल्या सर्चमध्ये रेमडेसिवीस इंजेक्शन, आरटी-पीसीआर टेस्ट, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णालयात बेज अशा कीवर्ड्सचा समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातील काही डेटा गोळा केला आहे. यानुसार महाराष्ट्रातीस लोकांनी सर्वाधिक वेळा रेमडेसिवीर नियर मी असं सर्च केलं आहे.

तर दिल्लीत राहणाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडर नियर मी, कोविड आरटी पीसीआर टेस्ट नियर मी आणि कोविड हॉस्पीटल नियर मी अशा काही टर्म्स सर्च केल्या आहेत.

याव्यतिरिक्त ७ ते १३ मार्चदरम्यान लोकांनी सर्च मध्ये आणखी एक टर्म वाढवली आहे. या दरम्यान लोकांनी कोविड वॅक्सिनेशन सेंटर नियर मी अशी टर्म सर्च केल्याचं समोर आलं आहे.

कोरोना विषाणूशी निगडीत या आवश्यक बाबींबाबत सर्च करणाऱ्या लोकांनी गुगल व्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सचीही मदत घेतली आहे.

या ठिकाणी लोकं पोस्ट टाकून आपल्या ओळखीच्या लोकांची किंवा नातेवाईकांची मदत घेत आहेत.

७ एप्रिल पर्यंत मिळालेल्या डेटानुसार प्रत्येक तासाला तब्बल २०० पेक्षा अधिक वेळा रेमडेसिवीर हा शब्द सर्च करण्यात आला.