काय सांगता? 2023 मध्ये Google वर भारतीयांनी 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:39 AM2023-12-12T11:39:04+5:302023-12-13T12:23:19+5:30

गुगलने 'इयर इन सर्च 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, मीम्स, प्रवास, पाककृती आणि अनेक विषयांचा समावेश आहे.

2023 हे वर्ष संपायला अवघे काही आठवडे उरले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शोधण्यात आल्या. या वर्षी देखील लोकांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले, ज्यावरून लोकांना कोणत्या विषयात जास्त रस आहे हे दिसून आले.

गुगलने 'इयर इन सर्च 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, मीम्स, प्रवास, पाककृती आणि अनेक विषयांचा समावेश आहे. नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च केल्या हे जाणून घेऊया...

Google ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाने सर्वांनाच आनंद झाला. लोकांनी या घटनेबद्दल देशांतर्गत ते जागतिक स्तरावर शोध घेतला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देशाचे हे पहिले यशस्वी लँडिंग झालं.

कर्नाटक निवडणूक निकालांबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आला. कर्नाटक विधानसभेचे सर्व 224 सदस्य निवडण्यासाठी 10 मे 2023 रोजी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जिथे काँग्रेसने 135 जागा जिंकून आपलं सरकार स्थापन केलं.

इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या भीषण युद्ध सुरू आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर असून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युद्धाबाबत देखील सर्वाधिक सर्च करण्यात आलं.

फिल्ममेकर आणि एक्टर सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी निधन झालं. सतीश कौशिक यांच्याबाबत गुगलवर अनेकदा सर्च करण्यात आलं.

दरवर्षीप्रमाणे यावेळीही भारतीयांना अर्थसंकल्पाची माहिती घेतली. निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला.

या वर्षी तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात 45 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे देश आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाला. हा विषय गुगलवर सर्च झाला.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुगलवर अतिक अहमदबाबत अनेकवेळा सर्च करण्यात आलं.

90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तो फ्रेंड्स या वेब सीरिजसाठी ओळखला जातो. यात त्याची भूमिका चँडलर बिंगची होती.

मणिपूर हिंसाचाराबाबतही सर्वाधिक चर्चा झाली. मणिपूरमध्ये 3 मे रोजी मेतई आणि कुकी जमात यांच्यात हिंसाचार झाला.

2 जून 2023 रोजी ओडिशातील बालासोरमध्ये रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस (12841) आणि मालगाडी यांच्यात जोरदार टक्कर झाली. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.