Google IO 2021: Android 12 ची घोषणा; प्रायव्हसीवर मोठी अपडेट, खासगी फोटोंसाठी 'खास कप्पा'...जाणून घ्या फिचर्स

Published: May 19, 2021 08:50 AM2021-05-19T08:50:08+5:302021-05-19T08:59:05+5:30

Google IO 2021 announced Google photo lock folder, location, camera history used by apps features: Android 12 मध्ये युजर प्रायव्हसीवर लक्ष दिले आहे. Google ने सांगितले प्रायव्हसी फीचर युजरचा डेटा चुकीच्या हातात जाण्यापासून वाचविणार आहे.

गुगल डेव्हलपर कॉन्फ्रेंस I/O 2021 ची आज सुरुवात झाली. या मध्ये गुगलने Android 12 आणि Google ने अनेक येणारे फिचर्सबाबत माहिती दिली आहे. ही कॉन्फ्रेंस 20 मेपर्यंत चालणार आहे. (Google I/O 2021 event kicked off online today, and will continue till 20 May. )

Android 12 मध्ये युजर प्रायव्हसीवर लक्ष दिले आहे. Google ने सांगितले प्रायव्हसी फीचर युजरचा डेटा चुकीच्या हातात जाण्यापासून वाचविणार आहे. गेल्या वर्षी गुगलने अँड्रॉईड 11 मध्ये नवीन प्रायव्हसी सेटिंग लाँच केले होते. यामध्ये अॅप्सला बॅकग्राऊंडला युजरचे लोकेशन पाहण्यापासून रोखले जात होते. सेन्सिटिव्ह माहितीच्या आधी अॅप्सला परमिशनची गरज पडते. (company made several announcements about several design and privacy updates for Android 12, Google Maps, Google Workspace, Google Photos and more.)

Google Android 12 मध्ये गुगलने पुढचे पाऊल टाकले आहे. कंपनीने Android 12 दोन मुख्य फिचरबाबत सांगितले आहे. Android 12 सोबत युजरला Privacy Dashboard आणि Private Compute Core फीचर्स देण्यात येणार आहेत.

Privacy Dashboard युजर्सला कोणत्या अॅपने कधी कधी कॅमेरा, मायक्रोफोन आणि डिव्हाईसच्या लोकेशनचे अॅक्सेस घेतला.

Privacy Dashboard मुळे युजरला गेल्या 24 तासांत किती वेळा कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा अॅक्सेस घेतला याची माहिती मिळणार आहे. यानुसार तुम्हाला एक क्विक ओव्हरव्ह्यू मिळणार आहे. यामुळे कोणत्या अॅपकडे कोणती परवानगी आहे हे पाहता येणार आहे.

फोनचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरल्यानंतर Android 12 मध्ये एक इंडिकेटर युजरला दाखविण्यात येणार आहे. यासोबत टॉगलदेखील दिला जाणार आहे, यानुसार ते डिसेबल देखील केले जाऊ शकते.

ज्य़ा अॅप्सला लोकेशनची परवानगी पाहिजे असेल त्यांच्यासाठी Android 12 मध्ये एक नवीन सेटिंग युजरला ऑफर केली जाणार आहे. यानुसार तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट लोकेशनऐवजी तुम्ही approximate लोकेशन शेअर करू शकता. याशिवाय टॉगलमध्ये तुम्ही कॅमेरा, मायक्रोफोन अॅक्सेसदेखील एकत्र डिसेबल करू शकता.

सध्या हे फिचर पिक्सल फोनमध्ये देण्यात येणार आहे. नंतर ते अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनसाठी रिलिज केले जाणार आहे.

याचबरोबर आणखी एक महत्वाचे फिचर दिले जाणार आहे. Private Compute Core या फिचरद्वारे तुमची माहिती खासगी ठेवली जाणार आहे. यामध्ये AI-driven फीचर्स, लाईव्ह कॅप्शन, नाऊ प्लेइंग आणि स्मार्ट रिप्लाय देण्यात येणार आहे. हे फिचर ऑपरेटिंग सिस्टिमपासून वेगळे ठेवण्यात येणार असल्याने ते सुरक्षित असणार आहे.

याशिवाय काही नवीन प्रायव्हसी फोकस्ड फिचर जसे की क्विक डिलीट, Google Photos मध्ये लॉक्ड फोल्डर, लोकेशन हिस्ट्री रिमाइंडर मॅप्सबाबत सांगण्यात आले आहे.