Facebook यूजर्स आता व्हा सावधान! ‘या’ कमेंट्स कराल तर जेलची हवा खाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:34 PM2022-01-22T17:34:17+5:302022-01-22T17:37:12+5:30

Facebook: काही वर्षांपासून जगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मागील काही वर्षात जगभरात पसरलेल्या इंटरनेटच्या जाळ्यानं प्रत्येकाला जवळ आणलं आहे. पूर्वी लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फारसी माध्यमं नव्हती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियानं प्रत्येकाला जोडून ठेवलं आहे.

त्यातच फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियानं तरुणाईला वेड लावलं आहे. आजच्या घडीला कोट्यवधी लोकं फेसबुकशी जोडले गेले आहे. फेसबुकच्या माध्यमातून लोकांचा संपर्क वाढला आहे. सध्याच्या युगात फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जर तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर लक्ष द्या. फेसबुकवर इतरांच्या पोस्टवर वाईट कमेंट्स करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला महागात पडू शकतं. फेसबुकनं आता अशा कमेंट्सवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर वेळीच तुम्ही स्वत:ला आवरलं नाही तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

सोशल मीडियाच्या वाढत्या क्रेझमध्ये फेसबुकनं यूजर्सच्या सुरक्षेला ध्यानात ठेवून योग्य ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पाहिलं असेल फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली तर त्यावर येणाऱ्या चुकीच्या कमेंट्स पोस्ट टाकणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरतात.

दुसऱ्यांच्या पोस्टवर चुकीच्या कमेंट्स करणं, नाहक त्रास देणे, पोस्ट करणाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे अशा यूजर्सवर फेसबुक कारवाई करण्याची शक्यता आहे. या यूजर्सनं स्वत:वर आवर घातला नाही तर भविष्यात त्यांना जेलची हवाही खावी लागेल.

‘या’ कमेंट्सपासून सावध व्हा – जर तुम्ही विचार करत असाल नेमक्या कोणत्या कमेंट्समुळे तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे. तर त्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. जर तुम्ही कुठल्याही पोस्टखाली जातीवादाची अथवा कुठल्या धर्माशी निगडीत कमेंट्स करू नका.

अशा कमेंट्स करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते. त्याचसोबत एखाद्याच्या पोस्टखाली बदनामी करणारी कमेंट्स, शिवीगाळ अथवा कमेंट्समध्ये अश्लिल फोटो, व्हिडिओ पाठवणे या कमेंटसवरही फेसबुक अशा युजर्सवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

जर तुमच्या कुठल्याही पोस्टवर केलेली कमेंट्स चुकीची अथवा अश्लिल आहे तर तुम्हीही याबाबत फेसबुककडे अधिकृत तक्रार नोंदवू शकता. फेसबुकनं प्रत्येक युजर्सला कुठल्याही कमेंट्सखाली रिपोट करण्याचा पर्याय दिला आहे. त्यावरुन यूजर फेसबुकला चुकीच्या कमेंट्सची तक्रार देऊ शकतो.

त्यामुळे फेसबुक पोस्टवर अशा प्रकारे कमेंट्स करण्यापासून स्वत:ला आवरा. जेणेकरून फेसबुक तुमच्यावर कारवाई करणार नाही आणि तुम्हाला फेसबुक वापरण्यात अडचण येणार नाही. अन्यथा सोशल मीडियावरील कमेंट्स तुम्हाला वैयक्तिक आयुष्यासाठी महागात पडेल.