शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:14 IST

1 / 8
सध्याच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्ता व्हॉट्सअॅपचा वापर करतो. याच कारणामुळे हे ॲप सायबर गुन्हेगारांसाठी महत्त्वाचं लक्ष्य बनलं आहे. भारतात ५०० दशलक्षाहून अधिक लोक व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहेत, त्यामुळे हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सोपी संधी आहे.
2 / 8
फिशिंग लिंक्स पाठवण्यापासून ते सिम-स्वॅप हल्ल्यांपर्यंत, असे अनेक मार्ग आहेत ज्यामुळे कुणाचंही व्हॉट्सअॅप अकाउंट धोक्यात येऊ शकतं. जर सुरक्षा सेटिंग्ज वेळेवर सक्रिय केली नाहीत, तर तुमची खासगी माहिती चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ शकते. मात्र, व्हॉट्सअॅपमध्ये अशी अनेक टूल्स आहेत जी काही मिनिटांत ॲक्टिव्हेट करून अकाउंटला सुरक्षित ठेवता येतात.
3 / 8
टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two-Step Verification) चालू करा. हे फीचर तुमच्या अकाउंटवर एक अतिरिक्त सुरक्षा कवच तयार करतं. नवीन डिव्हाइसवर लॉग-इन करताना ओटीपीसोबत सहा अंकी पिन देखील टाकावा लागतो. यामुळे हॅकर्ससाठी तुमची सुरक्षा भेदणं अत्यंत कठीण होतं.
4 / 8
फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीचा वापर केल्याने तुमचं व्हॉट्सअॅप सुरक्षित होतं. जर तुमचा फोन अचानक कुणाच्या हातात पडला, तरी तुमच्या ओळखीशिवाय ते तुमच्या चॅट्सपर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
5 / 8
डिसअपीयरिंग मेसेजेस (Disappearing Messages) वापरा. या पर्यायामुळे चॅट्स आपोआप एका ठराविक वेळेनंतर (२४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवस) गायब होतात. यामुळे खासगी माहिती जास्त काळ फोन किंवा क्लाउडवर सेव्ह होत नाही आणि धोका कमी होतो.
6 / 8
चॅट बॅकअप (Chat Backup) एन्क्रिप्ट करा. आपले व्हॉट्सअॅप चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत, पण जेव्हा तेच बॅकअप क्लाउडवर सेव्ह होतात, तेव्हा धोका असतो. जर तुम्ही बॅकअपवरही एन्क्रिप्शन चालू केलं आणि मजबूत पासवर्ड सेट केला, तर कुणीही तुमच्या जुन्या चॅट्सपर्यंत पोहोचू शकणार नाही.
7 / 8
प्रोफाइल प्रायव्हसी कंट्रोल्सकडे (Profile Privacy Controls) लक्ष द्या. या फीचरमुळे तुमची प्रोफाइल फोटो, शेवटची ऑनलाइन वेळ आणि स्टेटस कोण पाहू शकतं हे ठरवता येतं. अनोळखी लोकांपासून तुमची माहिती लपवून ठेवणे नेहमीच चांगलं असतं, कारण छोटीशी माहितीसुद्धा चुकीच्या कामासाठी वापरली जाऊ शकते.
8 / 8
सायबर गुन्हेगार सतत नवीन युक्त्या वापरत असतात, पण या पाच सोप्या बदलांनी तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट अधिक सुरक्षित करू शकता. प्रत्येक भारतीय युजरसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी या सेटिंग्ज लगेच ॲक्टिव्हेट कराव्यात, कारण हीच डिजिटल सुरक्षा जपण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान