'इंस्टाग्राम'वरुन लाखो कमावतोय हा 'कुत्रा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:25 PM2019-08-13T17:25:14+5:302019-08-13T17:29:40+5:30

इंस्टाग्रामवरुन केवळ सेलिब्रिटी माणसंच पैसा कमवतात असे नसून काही विशिष्ट कुत्रेही (डॉग्ज) लाखो रुपयांची कमाई करतात.

इंस्टाग्रामवर काही कुत्र्यांच्या फॉलोवर्संची संख्या 90 लाख असून ते एका पोस्टसाठी तब्बल 12 लाख रुपयांचे मानधन घेतात.

Jiffpom नावाचं एका कुत्रा Pomeranian जातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा इंस्ट्राग्रामवर स्टार आहे.

विशेष म्हणजे Jiffpom ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपलं नाव कोरलं आहे. दोन पायांवर पळणारा सर्वात वेगवान कुत्रा म्हणून याची नोंद आहे.

सन 2017 मध्ये Jiffpom आणखी एक विक्रम केला. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा तो कुत्रा ठरला. त्यावेळी 84 लाख फॉलोवर्स होते.

या कुत्र्याने कॅटी पेरी नावाच्या अमेरिकन सिंगरच्या अल्बममध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे या गायकासोबत काम करण्यासाठी चांगले सेलिब्रिटीही लाईनीत उभे आहेत.

हा पुशअप्स मारत व्यायाम करतो, इंस्टावर त्याच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

विशेष म्हणजे Jiffpom हा ब्रँडेड कपड्यांचा ब्रँड अॅम्बेसिडर असून तो जाहिरातीही करतो.