PUBG थीमवर असलेलं हे रेस्टॉरंट पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:12 IST2018-11-01T16:05:43+5:302018-11-01T16:12:42+5:30

हल्लीच्या जमान्यात मोबाईलबरोबरच PUBGच्या गेमचं महत्त्व वाढलं आहे.

. बऱ्याच जणांना या गेमचं व्यसन लागलं आहे. PUBGचा गेम खेळल्यानंतर काही जणांना नाश्त्यात चिकन खाण्यास आवडते.

अशाच प्रकारचं PUBG थीमवर आधारित असलेलं रेस्टॉरंड जयपूरमध्ये उघडलं आहे.

या रेस्टॉरंटच्या मुख्य द्वारापाशी तुम्हाला गवताचं मैदान दिसेल, हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावर भिंतीवर मिलिटरीची चित्रं साकारलेली दिसतील.

तसेच लालवाला ड्रॉप बॉक्सही पाहायला मिळेल. परंतु याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.