Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:14 PM2020-04-27T16:14:46+5:302020-04-27T16:26:22+5:30

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे.

दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशातील काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. काही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

चेहरा पाहून आता एखादी व्यक्ती निरोगी आहे की कोरोनाग्रस्त आहे हे समजणार आहे. शास्त्रज्ञांनी असं भन्नाट उपकरण तयार केलं आहे

आयआयटीच्या रोपरच्या इंजिनीअर्सनी कोरोनाच्या रुग्णांची माहिती मिळावी यासाठी हे खास उपकरण तयार केले असल्याची माहिती मिळत आहे.

इन्फ्रारेड व्हिजन सिस्टमच्या मदतीने हे केले जाणार आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती स्वत:चा चेहरा स्कॅन करेल.

चेहऱ्यावरून दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवर ती व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे की निरोगी हे समजण्यास मदत होणार आहे.

इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम 160x120 पिक्सेल रेजोल्युशनसह विविध प्रकारचे तापमान मोजतो.

छोटं आणि सुरक्षित असलेलं हे उपकरण कोणत्याही व्यक्तीशिवाय तपासणी करण्यास सक्षम आहे. मात्र या उपकरणाची क्लीनिकल ट्रायल अजून बाकी आहे.

एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आहेत का? तसेच ती व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे की निरोगी आहे हे ओळखण्यासाठी हे उपकरण मदत करणार आहे.

मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकांची तपासणी करण्यासाठी हे उपकरण खूप फायदेशीर ठरेल असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या लढाईत हे उपकरण महत्त्वपूर्ण ठरू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.