Airtel, Jio आणि Vi चे सर्वात स्वस्त प्लॅन्स; वर्षभर सिम कार्ड अॅक्टिव्ह राहणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:52 IST2025-07-31T12:49:37+5:302025-07-31T12:52:44+5:30
तुम्ही एअरटेल, जिओ किंवा व्हीआय युजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

२०२५ च्या सुरुवातीलाच TRAI ने Airtel, Jio, BSNL आणि Vi या दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांसाठी डेटा नसलेले स्वस्त प्लॅन आणण्याचे निर्देश दिले होते. ट्रायच्या आदेशानंतर तिन्ही खाजगी कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केले, ज्यामध्ये ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड सुरू ठेवण्याची मुभा मिळते.
खाजगी कंपन्यांचे हे प्रीपेड प्लॅन फक्त व्हॉइस आणि एसएमएससाठी वापरता येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंतची वैधता दिली जाते. जर तुम्ही देखील फीचर फोन वापरकर्ते असाल, तर तुम्ही हे प्लॅन्स निवडू शकता.
Airtel- एअरटेलकडे डेटा नसलेले दोन रिचार्ज प्लॅन आहेत. यापैकी एक प्लॅन ८४ दिवसांची वैधता देतो, तर दुसरा प्लॅन ३६५ दिवसांपर्यंतची वैधता देतो. एअरटेलच्या ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ४६९ रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये युजरला संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळेल. तसेच, यामध्ये ९०० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळेल. एअरटेलच्या ३६५ दिवसांच्या प्लॅनसाठी १८४९ रुपये खर्च येईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंग देखील मिळेल. यामध्ये, युजर सुमारे ३६०० मोफत एसएमएस पाठवू शकतो.
Jio- जिओकडे दोन प्लॅन आहेत, ज्यामध्ये ८४ दिवस आणि ३३६ दिवसांची वैधता दिली जाते. जिओच्या ८४ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. यासाठी ४४८ रुपये खर्च करावे लागतील. कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये १,००० मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळेल. तर, ३३६ दिवसांच्या प्लॅनसाठी १७४८ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा फायदा तर आहेच, शिवाय कंपनी ३६०० मोफत एसएमएस देत आहे.
Vi- व्होडाफोन आयडियाकडे डेटाशिवाय दोन प्लॅन ऑफर करत आहे. वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ४७० रुपये खर्च करावे लागतील. तर, ३६५ दिवसांचा प्लॅन १८४९ रुपयांना येतो. या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे देखील एअरटेलच्या दोन्ही प्लॅनसारखेच आहेत.