शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsAppचे 'हे' सेटिंग बदला; मोबाइल इंटरनेटचा डेटा वाचेल अन् फोनही होईल 'सुपरफास्ट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 5:26 PM

1 / 8
Change in WhatsApp Settings: सध्याच्या काळात इंटरनेट आणि त्यातही प्रामुख्याने WhatsApp हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कोणाचा नंबर असो की सामानाची यादी असो, आपण सर्रास ती गोष्ट व्हॉट्सअप करायला सांगतो.
2 / 8
आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत व्हॉट्सअपचा वापर करत असतो. हल्ली तर कार्यालयीन कामासाठीही बऱ्याच कंपनीतील कर्मचारी व्हॉट्सअपचा वापर करतात. व्हॉट्सअपचा वापर जितका जास्त होतो तितका तुमच्या फोनचा इंटरनेट डेटा जास्त वापरला जातो.
3 / 8
इंटरनेटचे रिचार्ज लवकर संपते किंवा ठराविक वेळेनंतर फोन स्लो चालतो अशी अनेकांची तक्रार असते. अशा युजर्सने काही सेटिंग्ज बदलली, तर तुमचा फोन फास्ट चालू शकेल आणि इंटरनेटचा डेटाही कमी खर्च होऊ शकेल.
4 / 8
सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनमधील WhatsApp चे अॅप्लिकेशन उघडा. मग व्हॉट्सअपच्या Settings मध्ये जाऊन Storage and Data सिलेक्ट करा.
5 / 8
या ठिकाणी तुम्हाला Media Auto Downloadचा पर्याय दिसेल. तिथे ३ पर्याय दिसतील. त्यात सेल्युलर डेटाचा वापर सुरु असताना कोणकोणत्या गोष्टी डाउनलोड होतात ते चेक करा आणि त्यातील नको असलेल्या पर्यायांवरील टीकमार्क काढून टाका.
6 / 8
तुम्ही ज्या पर्यायांवरील टीकमार्क तसाच ठेवाल त्या गोष्टी तुमच्या WhatsApp मध्ये तुम्ही काहीही न करता डाउनलोड होण्यास सुरुवात होतात आणि फोनच्या मेमरीमध्ये Save होऊ लागतात. त्यामुळे फोन स्लो होतो आणि इंटरनेट डेटादेखील जास्त वापरला जातो.
7 / 8
जर तुम्हाला तुमचा इंटरनेट डेटा कमी वापरला जायला हवा असेल तर या सर्व पर्यायांवरील टीकमार्क काढून टाका, जेणेकरून तुम्ही स्वत: डाउनलोड केल्याशिवाय कोणताही फोटो, व्हिडीओ, ऑडियो किंवा डॉक्युमेंट डाउनलोड होणार नाही.
8 / 8
तसेच, वायफाय सुरु असतानाही तुम्हाला अत्यावश्यक वाटत असतील अशाच गोष्टींच्या ऑटो-डाउनलोडला परवानगी द्या. इतर पर्यायांसमोरील टीकमार्क काढून टाका. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये अनावश्यक फाइल्स डाउनलोड होणार नाहीत आणि
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInternetइंटरनेटMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान