शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाटच! पेट्रोल पंपावर आता लाइन लावण्याची गरज नाही; BPCL ने ६५ शहरांत सुरु केली नवी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 3:35 PM

1 / 10
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलनंतर डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेल्या BPCL एक नवीन योजना सादर केली आहे.
2 / 10
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) आपल्या ग्राहकांना आउटलेटमध्ये अधिक चांगला अनुभव देण्यासाठी ऑटोमॅटिक इंधन भरण्याचे तंत्रज्ञान 'UFill' लाँच केले आहे.
3 / 10
या तंत्रज्ञानाद्वारे शून्य किंवा अंतिम रीडिंग आणि अशा ऑफलाइन मॅन्युअल हस्तक्षेपाकडे पाहण्याची गरज भासणार नाही. UFill मुळे इंधन भरण्याची प्रक्रिया वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट होईल असे कंपनीकडून प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
4 / 10
BPCL कडून हे तंत्रज्ञान आताच्या घडीला ६५ शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे असून, लवकरच ते देशभरात लाँच केले जाईल, असे कंपनीने सांगितले आहे. UFill तंत्रज्ञानाला कोणत्याही App डाउनलोडची आवश्यकता नसते आणि कोणत्याही UPI अॅपवरून वापरता येते.
5 / 10
UFill कंपनीच्या डिजिटल परिवर्तन प्रवासामध्ये अजून एक मैलाचा दगड आहे ज्याचा हेतू इंधन आउटलेटमध्ये ग्राहकांचा टर्न-अराउंड टाइम सुधारणे आणि व्यवहाराची पारदर्शकता वाढवणे आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
6 / 10
एकदा इंधन भरले की पेमेंट करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. BPCL च्या UFill प्रीपेड कोडसह, फक्त ड्राइव्ह आउट करा, असे कंपनीकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. UFill तंत्रज्ञानासाठी कोणत्याही App डाउनलोडची आवश्यकता नसते आणि कोणत्याही UPI अॅपवरून हे वापरता येते.
7 / 10
ग्राहक त्यांच्या फोनमधील कोणतेही पेमेंट Apps वापरू शकतात. यामध्ये GPay, PayTM, PhonePe अशा अॅप्सचा वापर ग्राहकांना करता येतो. हे एसएमएसद्वारे रिअल टाइम क्यूआर (QR) आणि व्हाउचर कोड प्रदान करते आणि सर्व BPCL इंधन केंद्रांवर स्वीकारले जाते.
8 / 10
तंत्रज्ञान ग्राहकाला रिफ्यूलिंग नियंत्रणासह टच-फ्री प्री-पेमेंट सोल्यूशन प्रदान करते. वितरण युनिट आपोआपच ग्राहकांनी आगाऊ भरलेल्या इंधनासाठी इंधनाची किंमत पूर्व-सेट करते आणि विक्रीच्या ठिकाणी कोणताही मानवी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते. अशा प्रकारे इंधन भरण्यापूर्वी किंवा अंतिम रीडिंग घेण्यापूर्वी शून्य तपासण्याची गरज नसते, वितरण युनिट आपोआप इंधनाचे अचूक प्रमाण वितरीत करते.
9 / 10
BPCL कंपनीच्या अधिकाऱ्यांसह डीलर्स, व्यवस्थापक आणि ड्राईव्ह-वे सेल्समनसह अनेक भागधारकांमध्ये हे प्रभावी आहे. BPCL नुसार, जर आगाऊ भरलेली रक्कम अंशतः वापरली गेली तर उर्वरित रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात त्वरित परत केली जाते.
10 / 10
जर ती ४८ तासांच्या आत वापरली गेली नाही तर, आगाऊ रक्कम ज्या बँक खात्यातून डेबिट केली गेली होती त्यात आपोआप परत केली जाईल. एकूणच ऑटोमॅटिक इंधन भरण्याचे तंत्रज्ञान 'UFill' मुळे BPCL च्या आउटलेटमध्ये ग्राहकांना आता चांगला डिजिटल अनुभव मिळणार असून वेळेचीही बचत होईल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय