Best Smart TV Under 20000: हे आहेत 20 हजारांच्या आत येणारे बेस्ट स्मार्ट टीव्ही; Flipkart Sale मध्ये मिळतायत जबरदस्त ऑफर्स
By सिद्धेश जाधव | Updated: February 2, 2022 20:00 IST2022-02-02T19:54:40+5:302022-02-02T20:00:38+5:30
Best Smart TV Under 20000: तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्मार्ट टीव्ही हवा असेल तर तुमची चिंता आज दूर होणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी 20 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या दमदार स्मार्टटीव्हीची यादी घेऊन आलो आहोत

फ्लिपकार्टवर बिग बचत सेल 3 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये 32 इंचाच्या काही ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट दिला जात आहे. यात सॅमसंग, वनप्लस, रियलमी, मोटोरोला आणि शाओमीचा समावेश आहे.
Realme 32 Inch HD Smart TV
हा एक एचडी रिजोल्यूशन असलेला 32 इंचाचा टीव्ही आहे. जो 60Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा टीव्ही 16999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Mi 4A PRO
Mi च्या या टीव्हीमध्ये एचडी एलईडी डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. गुगल असिस्टंट सपोर्टसह येणार हा टीव्ही 20W चं साऊंड आऊटपुट देतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत 16999 रुपये आहे.
OnePlus Y Series
OnePlus Y Series च्या 32 इंचाचा HD Ready LED स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही 1366X768 रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. यात 230 nits ब्राईटनेस आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. या स्मार्ट टीव्हीची किंमत 16999 रुपये आहे.
Samsung 32 Inch Smart TV
सॅमसंगच्या या 32 इंचाचा HD Ready LED टीव्हीची किंमत 17499 रुपये आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्यामुळे स्मूद पिक्चर क्वॉलिटी मिळते.
MOTOROLA ZX2 32 inch Smart TV
मोटोरोलाचा हा एचडी रेडी एलईडी लिस्टमधील महागडा टीव्ही आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटसह 40W चं साऊंड आऊटपुट देतो. यासाठी तुम्हाला 19999 रुपये मोजावे लागतील आहे.