या 5 बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन्ससह खेळा रंगपंचमी; बिनधास्त बुडवा पाण्यात, किंमत देखील कमी

By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 06:33 PM2022-03-15T18:33:06+5:302022-03-15T18:45:48+5:30

Best 5 Waterproof Smartphones in 2022: स्मार्टफोन वापरताना पाण्यापासून बचाव करावा लागतो. कारण कधी कधी काही शिंतोडेही तुमच्या फोनला निकामी करू शकतात. परंतु बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे वॉटरप्रूफ आहेत, आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत.

सध्या अनेक स्मार्टफोनमध्ये बेसिक वॉटर प्रूफिंग केलं जातं. परंतु अधिकृतपणे सर्टिफिकेशन दिलं जात नाही. आम्ही तुमच्यासाठी अशा पाच सर्वात बेस्ट वॉटरप्रुफ फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे सर्टिफिकेशनसह येतात.

Apple iPhone 13 Pro Max हा या यादीतला सर्वात महागडा स्मार्टफोन आहे, त्यामुळे यात वॉटरप्रुफ असणं अपेक्षित आहे. यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. या फोनची किंमत 1,29,900 रुपये आहे.

हा सॅमसंगच्या सर्वात शक्तिशाली फोन पैकी एक आहे. जो IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह येतो सोबत यात 108MP कॅमेरा, 40MP सेल्फी कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 8th Gen 1 चिपसेट आणि S-Pen सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत 1,18,999 रुपये आहे.

हा फोन Android 11 वर चालतो, यात Snapdragon 888 Plus चिपसेटसह 12 GB RAM देण्यात आला आहे. सोबत 50MP रियर कॅमेरा आणि 32 MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. IP68 रेटिंगसह येणाऱ्या या फोनची किंमत 79,990 रुपयांपासून सुरु होते.

हा एक रगेड स्मार्टफोन आहे त्यामुळे यात IP68 रेटिंग मिळणं अपेक्षित आहे. तसेच यात Snapdragon 480 चिपसेट, 6 GB RAM आणि 48 MP कॅमेरा मिळतो. या फोनची किंमत 46,998 रुपयांपासून सुरु होते.

या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे. यात MediaTek Dimensity 810 चिपसेट, 4 GB RAM, 6.6 इंचाचा डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, 50MP रियर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळते. हा एक IP53 स्प्लॅश आणि डस्ट प्रूफ स्मार्टफोन आहे.