सावध व्हा! तुमच्यावर सतत 'वॉच' आहे, पण कोणाचा...?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:42 AM2020-11-19T01:42:46+5:302020-11-19T01:53:23+5:30

Facebook : फेसबुक काय किंवा समाजमाध्यमावरचे इतर अकाऊंट काय हे आपले आभासी जग असते परंतु या जगात तुमच्यासमोर काय यावे याचा निर्णय तुमच्या हातात नसतो तर तो असतो फेसबुकच्या हातात...फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनीच तशी कबुली दिली आहे.

फेसबुक काय किंवा समाजमाध्यमावरचे इतर अकाऊंट काय हे आपले आभासी जग असते परंतु या जगात तुमच्यासमोर काय यावे याचा निर्णय तुमच्या हातात नसतो तर तो असतो फेसबुकच्या हातात...फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनीच तशी कबुली दिली आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमे आपल्या न कळत आपला कसा वापर करून घेतात, याचा घेतलेला मागोवा..

ट्विटर, गुगलशी सेन्सॉरशिपसंदर्भात समन्वय साधण्यास टास्क्स ही इंटर्नल प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम फेसबुक वापरते. ट्विटर, गुगल हॅशटॅग, वेबसाइट्स इत्यादींचा सेन्सॉरशिप मुद्दे म्हणून शिफारस करतात. मग फेसबुक त्यानुसार त्या त्या व्यक्ती व संकेतस्थळे यांचा टास्क्स या टुलवर लॉग-इन करून त्यांचा पाठपुरावा करण्याचे निर्देश देते.

इतर समाजमाध्यमावर युझर काय करतो याची इत्यंभूत माहिती फेसबुककडे जमा होते.

वापरकर्त्याचा माग ठेवते. दिवसभरात इंटरनेटवर कोणकोणत्या संकेतस्थळांना भेट दिली त्याचा प्रोफाइल तयार करते

कोणाकोणाचे मेसेज आले. ज्या ज्या लोकांशी संपर्क साधला त्या त्या लोकांचे अकाऊंट्स, त्याच्याशी निगडीत असलेले अकाऊंट्सची माहिती घेतो

फेसबुकच्या बटनाची सोय असलेल्या कोणकोणत्या वेबपेजेसना वापरकर्ता भेट देतो

प्रयोग म्हणून तुम्ही गुगलवर एखाद्या वस्तूविषयी सर्च करा. काही क्षणांत तत्सम वस्तूंच्या जाहिराती उजवीकडे तुम्हाला दिसू लागतील. हेच तर फेसबुकच्या यशाचे गमक आहे.

फेसबुक जमा झालेला माहितीसाठा गुगल आणि ट्विटर यांच्याकडे शेअर करते.

वापरकर्ता कोणते फोटो अपलोड करतो, कोणते फोटो लाइक करतो, कुठले कार्यक्रम वापरकर्त्याला जास्त आवडतात, वापरकर्ता कुठे जातो, त्याला काय बघायला आवडते, कोणते खेळ आवडतात, कोणाच्या फोटोंंवर वापरकर्ता सर्वाधिक कमेंट करतो, सर्वाधिक कोणाशी बोलोत याची इत्यंभूत माहिती फेसबुक गुगल आणि ट्विटरकरडे देते.

मग गुगल आणि ट्विटर वापरकर्त्याच्या आवडीनुसार मजकूर वा तत्सम माहितीसाठा त्याच्यासमोर ठेवतात. एखाद्या वापरकर्त्यावर गुगल किंवा ट्विटर यांच्यापैकी एकाने बंदी घातली तर त्याचे पडसाद सर्वच समाजमाध्यमी अकाऊंटवर उमटून त्या वापरकर्त्याला इतरही ठिकाणी बंदीला सामोरे जावे लागते.

वापरकर्त्याने फेसबुकवर अधिकाधिक वेळ घालवावा म्हणून मग त्याच्या न्यूजफीडमध्ये त्यानुसार बदल करण्यात येतात.

वापरकर्त्याला मांजरींचे व्हिडिओज, प्रेरणादायी फोटोज, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी राग येईल असा मजकूर किंवा त्यांना विरोध करणाऱ्यांचा राग येईल असा मजकूर दाखवला जातो.

जाहिरातदारांना तुम्हाला लक्ष्य करता यावे, यासाठी फेसबुक मदत करते. त्या ॲड्स जितक्या चांगल्या चालतात तितके फेसबुकला पैसे मिळतात.

थोडक्यात युजर हा ग्राहक ठरतो. जाहिरातदार फेसबुकच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या प्रॉडक्टकडे आकर्षित करतात. त्यातून फेसबुक पैसे कमवतो.

समाजमाध्यमांवर वापरकर्ता जसा व्यक्त होत असेल त्याच्या आधारावर वापरकर्त्याची प्रतिमा तयार केली जाते. वापरकर्त्याला जे आवडते, पटते, भावते त्याच गोष्टी त्याच्यासमोर सादर केल्या जातात. संकलन : विनय उपासनी