शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:46 IST

1 / 5
भारतीय लष्कराने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. डेहराडूनच्या बीएसएस मटेरियल कंपनीने १४००० फूट उंचीवर त्यांच्या नवीन एआय-आधारित ऑटोनॉमस लेथल वेपन सिस्टम, नेगेव एलएमजीची यशस्वी चाचणी घेतली आहे.
2 / 5
हे शस्त्र शत्रूंना ओळखू शकते आणि स्वतःहून गोळीबार करू शकते. भारतीय लष्कराबरोबरच्या चाचणीमुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ बळकट होईल. सीमेवर सुरक्षा वाढेल.
3 / 5
भविष्यातील युद्धांमध्ये, विशेषतः सीमावर्ती भागात हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे ठरू शकते. मानवी सैनिक तैनात करणे धोकादायक असलेल्या ठिकाणी हे शस्त्र उपयुक्त ठरू शकते.
4 / 5
जगातील सर्वात धोकादायक मशीनगनपैकी एक. तिचे वजन ७.६५ किलो आहे. ती ५.५६x४५ मिमी नाटो मॅगझिन वापरते. ती गॅसवर चालणाऱ्या रोटेटिंग बोल्ट तंत्रज्ञानावर काम करते.
5 / 5
ती एका वेळी प्रति मिनिट ८५० ते १०५० राउंड्स वेगाने गोळीबार करते. गोळ्या ९१५ मीटर प्रति सेकंद वेगाने शत्रूचा नाश करू शकतात. या मशीनगनची फायरिंग रेंज ३०० ते १००० मीटर आहे.
टॅग्स :Defenceसंरक्षण विभागArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सIndian Armyभारतीय जवान