अ‍ॅपलचा ट्रिपल धमाका; 11 व्या पिढीचे तीन फोन लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 07:49 AM2019-09-11T07:49:33+5:302019-09-11T08:38:02+5:30

स्मार्टफोन बनविणारी जगप्रसिद्ध कंपनी अ‍ॅपलने 11 व्या पिढीचे तीन आयफोन लाँच केले आहेत. याचबरोबर नवीन गेमिंग सर्व्हिस अ‍ॅपल ऑर्केड, ५ व्या पिढीचे अ‍ॅपल वॉच आणि ७ व्या पिढीचे 10.2 इंचाचा आयपॅडही लाँच केला आहे.

आयफोन 11 आणि आयफोन ११ प्रो 64,128 आणि 256 जीबी अशा तीन व्हेरिअंटमध्ये मिळणार आहे. तर तिसरा फोन आयफोन 11 प्रो मॅक्स 64, 256 आणि 512 जीबी अशा व्हेरिअंटमध्ये मिळणार आहे.

या तिन्ही फोनची ऑनलाईन बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर काही मोजक्या देशांमध्ये हे फोन 20 सप्टेंबरला मिळणार आहेत. तर भारतात या फोनची विक्री 27 सप्टेंबरपासून सुरू होईल.

आयफोन 11 मध्ये कंपनीने पहिल्यांदाच ड्युअल कॅमेरा दिला आहे. 12 + 12 मेगापिक्सलचा हा कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठीही 12 एमपीची लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी कॅमेरातून 4के व्हिडिओही बनविता येणार आहे.

हा फोन पाच रंगांत उपलब्ध होणार आहे. iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच नवीन A13 बॉयोनिक चिपचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये iOS 13 ही ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार आहे.

iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. A13 Bionic चिपसेट प्रोसेसर आहे. मात्र, पहिल्यांदाच कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा दिला असून डीप फ्यूजन कॅमेराही यामध्ये आहे.

iPhone 11 Pro Max मध्ये 6.5 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. A13 Bionic चिपसेट प्रोसेसर आहे. 60Fps चा 4K व्हिडिओ शूट करता येणार आहे.

iPhone 11 Pro, 11 Pro Max या दोन्ही फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याचे अपर्चर f/1.8 आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. याचे अपर्चर f/2.4 आहे. हे कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाझेशनचे आहेत.

तिसरा कॅमेराही 12 मेगापिक्सलचाच असून झूम कॅमेरा आहे. अपर्चर f/2.0 असून दोन्ही फोन 4X ऑप्टिकल झूम फिचरसोबत येतात.

आयफोन 11 ची किंमत 64,999 हजार, आयफोन प्रोची किंमत 99,990, आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1,09,000, अॅपल वॉचची किंमत 40,900 आणि आयपॅडची किंमत 29,990 असण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपल वॉच लाँच केले आहे.

10.8 इंचाचा आयपॅड लाँच करण्यात आला आहे.