जुना फोन बदलून खरेदी करा नवीन आयफोन, २३००० रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 04:21 PM2020-09-25T16:21:45+5:302020-09-25T16:55:43+5:30

अॅपल कंपनीने भारतात पहिल्यांदा ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. ग्राहकांना आता या ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातून अॅपलचे प्रोडक्ट्स खरेदी करता येणार आहेत. ऑनलाइन स्टोअर सुरू केल्यामुळे ग्राहकांना बरेच फायदे मिळतील, त्यातील एक म्हणजे अॅपल ट्रेड इन प्रोग्रॉम आहे.

अॅपल ट्रेड इन प्रोग्राम अंतर्गत ग्राहक जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करून नवीन आयफोन खरेदी करू शकतात. यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर स्मार्टफोनची लिस्ट देण्यात आली आहे. ती पाहू शकता.

जुने आयफोनला एक्सचेंज करून ग्राहक 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. अँड्रॉइड स्मार्टफोन्स एक्सचेंज करताना ग्राहकांना जास्तीत जास्त 23,020 रुपयांची सूट मिळू शकते.

उदाहरणार्थ, जर जुना Galaxy S9 स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ग्राहकाला 13,140 रुपयांच्या किंमतीचे ट्रेड इन व्हॅल्यू मिळेल. त्याचप्रमाणे, जुन्या iPhone 7 ची ट्रेड इन व्हॅल्यू12,000 रुपये आहे.

अॅपल इंडिया वेबसाइटला भेट देऊन ग्राहक iPhone Buy ऑप्शनवर जाऊ शकतात. मॉडेल आणि मेमरी व्हेरिएंट सिलेक्ट केल्यानंतर जुन्या स्मार्टफोनचे डिटेल्स अपलोड करावी लागेल. इन्स्टंट क्रेडिट अप्लाय होईल आणि नवीन आयफोनची किंमत कमी दिसेल.

यानंतर आता, अगदी सामान्य खरेदीप्रमाणेच, स्मार्टफोन खरेदी करावा लागतो. खरेदी केल्यानंतर कंपनी आपल्याला ट्रेड इनसाठी स्मार्टफोन तयार ठेवण्यास सांगेल. ज्यावेळी स्मार्टफोन आपल्या लोकेशनवर डिलिव्हरी करण्यासाठी येईल, त्यावेळी आपल्याला जुना स्मार्टफोन द्यावा लागतो.

कंपनीकडून ऑन द स्पॉट जुन्या स्मार्टफोनची तपासणी केली जाईल. त्यानंतर स्मार्टफोन पात्र ठरल्यास तो घेईल आणि आपल्याला नवीन स्मार्टफोन दिला जाईल.

जुन्या आयफोनसाठी असा आहे, ट्रेड इन प्रोग्राम. यामध्ये iPhone XS Max पासून iPhone 5S स्मार्टफोनपर्यंत पात्रता आहे. iPhone 5S स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपये आहे.

जुन्या अँड्राईड स्मार्टफोनसाठी असा आहे, ट्रेड-इन प्रोग्राम. सध्या यामध्ये सॅमसंग आणि वन प्लसच्या स्मार्टफोनची यादी आहे.