Apple : आता तुम्ही सांगाल तसा फोटो एडिट होणार; 'या' फोनमध्ये मिळणार फिचर, कंपनीची मोठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:28 IST2025-02-10T13:11:10+5:302025-02-10T13:28:15+5:30
Apple : आयफोनने आपल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Apple : अॅपलने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, यापुढे आता अॅपलच्या फोनवर तुम्हाला फोटो एडिट करणे सोपे होणार आहे. तुम्ही फक्त फोटो कसा एडिट करुन हवा हे सांगावं लागेल. त्यानंतर तुम्हाला लगेच फोटो एडिट करुन मिळेल.
एआय असिस्टंट सिरीला पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रभावी बनवण्यासाठी अनेक अपग्रेडेड फीचर्स दिले जाणार आहेत.
या अपडेटमुळे वापरकर्त्यांना ऑन-स्क्रीन अवेअरनेस सारखे फिचर मिळणार आहेत. त्यात अॅपल इंटेलिजेंस पॉवर्ड एन्हांस्ड पर्सनलायझेशन असणार आहे.
या अपडेटसह, सिरी पूर्वीपेक्षा अधिक वैयक्तिकृत अनुभव देईल. वापरकर्त्यांच्या पसंती ऑप्टिमाइझ केल्या जातील आणि सिरी अधिक संबंधित प्रतिसादांसाठी वैयक्तिक डेटाचा वापर करण्यास सक्षम असणार आहे.
या अपडेटमध्ये'ऑन स्क्रीन अवेअरनेस'. या फिचरमुळे, सिरी स्क्रीनवर काय चालले आहे ते समजून घेण्यास सक्षम असेल.
यानुसार ते काम करण्यास सक्षम असेल. जर एखाद्या मित्राने तुम्हाला त्याचा पत्ता मेसेजमध्ये पाठवला, तर तुम्ही सिरीला हा पत्ता कॉन्टक्ट लिस्टमध्ये जोडायला सांगितले तर ते लगेच जोडून घेईल.
पुढचे फिचर 'इन-अॅप अॅक्शन्स', हे फिचर तुम्हाला अॅप न उघडता त्यावर काम करण्याची परवानगी देते. यासाठी ते अॅपलच्या नवीन अॅप इंटेंट्स प्लॅटफॉर्मचा वापर करते. वापरकर्ते फक्त सिरीशी बोलून विशिष्ट फोटो शोधू शकतील, तो एडिट करु शकतील. यासाठी कोणतेही अॅप उघडण्याची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही फक्त त्याला सांगायचे आहे.
याशिवाय आणखी काही फिचर आहेत. जे अपडेट रोलआऊट होणार आहेत.
प्रायोरिटी नोटीफिकेशन: अॅपल इंटेलिजेंस महत्त्वाच्या सूचनांना प्राधान्य देईल आणि त्या सूचना बारच्या वरच्या बाजूला दाखवेल.
इमेज प्लेग्राउंड एन्हांसमेंट: यात “स्केच” फीचर सारखी एक नवीन शैली देखील दिली आहे.
आता अॅपलच्या फोनमध्ये एआय-चलित फिचर फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश, जपानी, कोरियन, सरलीकृत चीनी आणि स्थानिक इंग्रजी (भारत आणि सिंगापूर) मध्ये उपलब्ध असतील. iOS 18.4 अपडेट लवकरच जागतिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.