दिवाळी सेलमध्ये होऊ शकते मोठी फसवणूक; ऑनलाईन शॉपिंग करताना चुकूनही करू नका 'या' चुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 20:14 IST2021-10-26T20:04:20+5:302021-10-26T20:14:03+5:30
Shopping mistakes to avoid this diwali sale : दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंग वेबसाईट्सवर ऑनलाईन सेल सुरू आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने शॉपिंग वेबसाईट्सवर ऑनलाईन सेल सुरू आहेत. दरवर्षी प्रमाणे Amazon, Flipkart आणि ShopClues पासून प्रत्येक वेबसाईट प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर्स देत आहे.
तुम्ही मोबाईलपासून ते टीव्ही, लॅपटॉप, कपडे सेलमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, अनेकदा डिस्काउंटच्या नादात नुकसान देखील होते. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्स सक्रीय झाल्या असून, स्मार्टफोन, एक्सेसरीज आणि घड्याळांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे.
wellbuymall.com या वेबसाईटबाबत देखील अनेकांनी तक्रार केली होती. ग्राहकांचा दावा आहे की, यावरून ऑर्डर केल्यानंतर त्यांना वस्तूंची डिलिव्हरी झाली नाही. त्यामुळे यंदा दिवाळीत अशा फसवणुकीपासून सावध राहा. 'या' गोष्टी लक्षात ठेवा
ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात
नेहमी सुरक्षित वेबसाईट्सवरूनच शॉपिंग करा. URL मध्ये https:// (S चा अर्थ सिक्योर असा आहे) असल्यास ती वेबसाईट सुरक्षित आहे असे समजा.
नेहमी Amazon, Flipkart, ShopClues, Pepperfry सारख्या लोकप्रिय साईट्सवरूनच खरेदी करावी. नवीन वेबसाईटवरून शॉपिंग केल्यास फसवणूक होऊ शकते.
तुमच्या सिस्टममध्ये नेहमीच अँटी-व्हायरस अपडेट ठेवा. तसेच, कोणी खासगी, बँक माहिती मागितल्यावर लगेचच सावध व्हा.
अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. व्हॉट्सएप, फेसबुक सारख्या एप्सवर तुमच्या बँक खात्याची माहिती शेअर करू नका.
जर तुम्हाला ऑफर खूपच आकर्षक वाटत असल्यास त्वरित सतर्क व्हा. कारण, कोणतीही वस्तू कधीच मोफत मिळत नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.