२१ का २२...! वीज वाचवायची असेल तर एसी किती तापमानावर ठेवावा? फ्रिजचे काय...; जाणून घ्या टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:16 IST2025-03-18T12:53:05+5:302025-03-18T13:16:19+5:30

Save Electricity Bill on AC: तुम्हाला माहितीये का तुमचा एसी कोणत्या तापमानावर ठेवला तर तुमचे वीज बिल कमी येईल? तुम्हाला माहितीये का तुमचा फ्रिज कोणत्या नंबरवर ठेवला तर वीज कमी वापरेल? नाही ना...

उन्हाळ्यात तुमचे वीज बिल सर्वाधिक वाढविणारी दोन-तीन उपकरणे आहेत. ती म्हणजे एसी, फ्रिज आणि फॅन. या सर्वांची सेटिंग नीट केली नाही तर तुम्हाला खिशाला झळ बसू शकते.

उष्णतेनुसार तुम्ही एसी, फ्रिजचे तापमान सेट करू शकता. ते जर योग्य ठेवले तरच तुमचे वीज बिल कमी येऊ शकते. नाहीतर ते भरमसाठ वाढू शकते.

तुम्हाला माहितीये का तुमचा एसी कोणत्या तापमानावर ठेवला तर तुमचे वीज बिल कमी येईल? तुम्हाला माहितीये का तुमचा फ्रिज कोणत्या नंबरवर ठेवला तर वीज कमी वापरेल? नाही ना...

हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला थोड्याशा माहितीची गरज आहे. तुमच्या एसी, फ्रिजवर हे आकडे लिहिलेले असतात परंतू त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणावर ते किती वॅट वीज वापरते हे लिहिलेले असते. उदाहरण घेऊया... जर एखाद्या उपकरणावर २०० वॅट असे चिन्हांकित केले असेल, तर ते दर ५ तासांनी १ युनिट (kWh) वीज वापरेल. त्याची गणना करण्यासाठी, तुम्ही हे सूत्र वापरू शकता: पॉवर (वॅट्स) × वेळ (तास) ÷ १००० = युनिट्स (kWh)

जर तुम्हाला तुमच्या एसी, फ्रिजच्या वीज वापराची माहिती जाणून घ्याची असेल तर एक काम करू शकता. तुम्ही ती उपकरणे बंद करावीत. नंतर वीज मीटरचे रिडिंग घ्यावे.

आता तुम्हाला ज्याची माहिती हवी आहे ते उपकरण चालू करा आणि पुन्हा मीटर रिडिंग घ्या. यावरून ते उपकरण किती वीज वापरते याची माहिती मिळेल.

रेफ्रिजरेटर सहसा दररोज ०.५ ते १ युनिट वीज वापरतो. जर तुमचा रेफ्रिजरेटर खूप मोठा असेल किंवा त्याची कूलिंग क्षमता जास्त असेल तर विजेचा वापर देखील वाढणार हे लक्षात ठेवावे. फ्रिजमध्ये आत नॉब दिलेला असतो व चार्टही असतो. त्यानुसार खटका फिरवावा.

एलईडी टीव्ही प्रति तास सुमारे ५० ते १५० वॅट वीज वापरू शकतात आणि जुने सीआरटी टीव्ही २०० वॅटपर्यंत वीज वापरू शकतात.

वॉशिंग मशीनचा वीज वापर त्याच्या मॉडेल आणि मोडवर अवलंबून असतो, परंतु सरासरी ते प्रति तास ४०० ते १५०० वॅट्स घेऊ शकते.

तुमचा एसी जर तुम्हाला जास्त वीज वापरू नये असे वाटत असेल तर तुम्ही तो २४ ते २६ या टेम्परेचरवर सेट करावा. थंड हवे असेल तर २४, साधारण थंड हवे असेल तर २६.

टॅग्स :वीजelectricity