Hotness Alert! जगातल्या सर्वात Hot नर्सकडे लागते तरूण रूग्णांची रांग, तिचे फोटो पाहूनच दूर होत असतील त्यांचे आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:12 PM2020-02-25T12:12:12+5:302020-02-25T12:18:49+5:30

सध्या सोशल मीडियाचा अनेकजण आपलं टॅलेन्ट दाखवण्यासाठी चांगला वापर करत आहे. अनेकांना या प्लॅटफॉर्मचा फायदाही होताना दिसतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सोशल मीडियाचा वापर करून फायदा करून घेतात.

काही दिवसांपूर्वी चीनमधील एक बॉडी बिल्डर असलेल्या महिला डॉक्टरचे काही फोटो व्हायरल झाले होते.

आता त्यानंतर तायवानमधील एका नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. या नर्सचे फोटो इतके हॉट आहेत की, पेशन्ट तिचे फोटो बघूनच बरे होतील की काय असा विचार येतो.

गेल्या वर्षी ही मॉडल तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

कॅरिना लीन असं या नर्सचं नाव असून लोक तिला जगातली सर्वात सुंदर नर्स असं म्हणत आहेत. कारण तिचे फोटो जगभरात लोकप्रिय झाले असून तिचे इन्स्टाग्राम फालोअर्सही वाढले आहेत.

कॅरिनाच्या सौंदर्याने तरूणांना भुरळ घातली असून तिच्याकडे खोटं कारण सांगत तरूणांची रांग लागत असल्याचे बोलले जात आहे.

कॅरिना ही तायवानमधील मीन-शेंग जनरल हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. या हॉस्पिटलमध्ये ती सेलिब्रिटी तर झाली आहेच सोबत जगभरातही तिचे फॅन वाढले आहेत.

कॅरिनाच्या फोटोंमुळे तिला आता इन्स्टाग्रामवर चार लाख ६५ हजार फॉलेअर्स आहेत.

कॅरिनाने सांगितले की, ती हे फोटो फेमस होण्यासाठी टाकते. तसेच तिला चांगलं वाटतं म्हणून ती हे फोटो शेअर करते. तिचं असं मत आहे की, ती फार काही वेगळं करत नाहीय.

अनेकांनी तिच्या प्रोफेशनमुळे तिच्यावर टीका सुद्धा केली. पण ती याकडे सकारात्मकपणे बघते. तिने सोशल मीडियावर लिहिले की, तुम्हाला टीका करायची आहे तर करा. तो तुमचा बोलण्याचा अधिकार आहे.