विमानाला पक्षी धडकतो तेव्हा काय होते? आतापर्यंत झालेत २६२ मृत्यू आणि २५० विमानांना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:56 AM2024-06-23T11:56:13+5:302024-06-23T12:09:21+5:30

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मते, ९०% पक्ष्यांची टक्कर विमानतळांजवळ होते.

व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे विमान व्हीए १४८ न्यूझीलंड येथून मेलबर्नसाठी निघाले असता पक्षी धडकल्याने विमानाच्या उजव्या इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला. त्यानंतर आगीच्या ज्वाला निघू लागल्या. यामुळे पायलटने तत्काळ विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लॅडिंग केले.

या विमानात ७३ प्रवासी होते. विमानाला पक्षी धडकणे ही सामान्य बाब असली तरीही त्यात मोठा धोका आहे. यामुळे विमानाचे नुकसान होऊ शकते आणि प्रवाशांचा मृत्यूही होऊ शकतो. जागतिक स्तरावर, १९८८ पासून पक्ष्यांच्या धडकेमुळे २६२ मृत्यू झाले असून, २५० विमानांचा अपघात झाला आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मते, ९०% पक्ष्यांची टक्कर विमानतळांजवळ होते.

सर्वसाधारणपणे, जेव्हा विमाने टेक ऑफ किंवा लैंडिंग करत असतात किंवा कमी उंचीवर उड्डाण करत असतात तेथे पक्षी किवा पक्ष्यांचे थवे असतात.

पक्षी विमानाला धडकल्यानंतर इंजिन बंद पडण्याची भीती सर्वाधिक असते. लहान विमानांमध्ये, विशेषतः एकच इंजिन असलेल्या विमानासाठी पक्ष्यांची टक्कर धोकादायक ठरू शकते.

१६,६२६ पक्ष्यांची धडक २००८ ते २०१७ दरम्यान झाल्याची नोंद ऑस्ट्रेलियन वाहतूक सुरक्षा बोर्डने केला आहे. १७,२०० पक्ष्यांच्या धडकेची नोंद एकट्या अमेरिकन हवाई खात्याने २०२२ मध्ये केली. ९०% पक्ष्यांची टक्कर विमानतळांजवळ होते.

१ पक्ष्यांची धडक म्हणजे विमान आणि पक्षी यांच्यातील टक्कर. १९०५ मध्ये ओहियोमधील मक्याच्या शेतात ऑव्र्व्हिल राईट यांनी पक्षी-विमानाची पहिली टक्कर नोंदवली. आता पक्ष्यांच्या स्थलांतरणामुळे असे अपघात रोज घडत आहेत.

आतापर्यंतची सर्वात मोठी स्थलांतरित पक्षी-विमानाची २ टक्कर २००९ मध्ये झाली होती. यात यूएस एअरवेजच्या १५४९ या विमानाने न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावरून उडाण केल्यानंतर काही वेळातच स्थलांतरित कॅनेडियन राजहंस पक्ष्यांच्या कळपाचा सामना करावा लागला होता. यात विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले होते. यामुळे पायलट सुली सुलेनबर्गर यांना विमान हडसन नदीत उतरवावे लागले होते.

सर्वाधिक पक्ष्यांची विमानाला धडक पहाटे किंवा सूर्यास्तावेळी होते. अशावेळी वैमानिकांना सतर्क राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पक्ष्यांचा कळप कुठे आहे यासाठी रडारचा वापर केला जाऊ शकतो. पक्ष्यांना धावपट्टीजवळ फिरण्यापासून रोखण्यासाठी लहान गॅस स्फोटांचा वापर करण्यात येतो.

टॅग्स :विमानairplane