शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह

By manali.bagul | Published: September 27, 2020 5:41 PM

1 / 7
इंदूरमधील ग्रेटर कैलाश रुग्णालय नेहमीच आपल्या निष्काळजीपणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे रुग्णालय वादाच्या कचाट्यात अडकलं आहे. या रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर दोन दिवसांनी नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे. ही घटना नेमकी कशी घडली जाणून घ्या.
2 / 7
खंडवा येथिल रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याचा रात्री मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी रुग्णालयाचील कर्मचाऱ्यांनी मृतदेह नातेवाईकांकडे सोपावला. जेव्हा या मृत व्यक्तीचे नातेवाईक इंदूरपासून जवळपास ६० किलोमीटर लांब पोहोचले. तेव्हा अचानक रुग्णालयातून फोन आला आणि मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे सांगण्यात आले. तुमच्याकडे महू येथिल रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील वयस्कर व्यक्तीचा मृतदेह असल्याचे सांगण्यात आले.
3 / 7
महू येथिल रहिवासी असलेल्या मृत व्यक्तीचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा या प्रकरणाचा तपास लागला. तो मृतदेह खंडवा येथिल रहिवासी असलेल्या व्यापाऱ्यांचा होता. त्यानंतर रुग्णालयातील प्रशासनाने दखल घेत फोनवरून संपर्क साधून वृद्धाचा मृतदेह घेऊन ६० किलोमीटर लांब गेलेल्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल केली.
4 / 7
या प्रकरणानंतर खंडवा येथिल रहिवासी असलेल्या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६४ वर्षीय वडिलांना कोरोना संक्रमण नसतानाही कोविड वार्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर महू येथिल वयस्कर व्यक्तीचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला होता.
5 / 7
या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ खंडवा येथिल नातेवाईकांना काढला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीही ग्रेटर कैलाश रुग्णालयात अशा प्रकारची घटना घडली होती.
6 / 7
या प्रकरणानंतर आरोग्य विभाग अधिकारी अमित मालाकार यांनी सांगितले की, ''ग्रेटर कैलाश रुग्णालयात एक मृतदेह नॉर्मल आणि एक कोरोनाबाधित होता. यांच्याच पॅकिंग दरम्यान अदलाबदल झाली.
7 / 7
रुग्णालय प्रशानसानं आपली चूक मान्य करत मृतदेह योग्य ठिकाणी पोहोचवला. यापुढे असा प्रकार घडल्या योग्य कारवाई केली जाईल.'' असंही ते म्हणाले .
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलhospitalहॉस्पिटल