शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्रीच्यावेळी घरात घुसला, कुटुंबीयांनी पाहिलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:25 IST

1 / 8
नवी दिल्ली : तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जानम....हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे गाणे ज्यावेळी तुम्ही पाहता, त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण येत असेल. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापासून दूर राहणे खूप कठीण असते.
2 / 8
अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी अनेकवेळा प्रियकर धोकाही पत्करतात, त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. हे गाणे सर्वांच्याच जिभेवर रुळले होते, पण नंतर उत्तर प्रदेशातील मेरठमधून अशी एक लव्हस्टोरी समोर आली आहे, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.
3 / 8
खरंतर, ही लव्हस्टोरी मेरठच्या फतेहुल्लापूरच्या लिसाडिगेट पोलीस स्टेशन भागातील आहे. याठिकाणी लहानपणापासून प्रेम करणाऱ्या जोडप्याची कहाणी समोर आली तेव्हा त्यांच्यासोबत एक मजेदार घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही लव्हस्टोरी मुस्कान आणि साकिबची आहे.
4 / 8
हे दोघे बालपणीचे मित्र होते. दोघेही लहानपणी मित्र होते, पण जसजसे ते मोठे झाले तसतसे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. याबाबत दोघांच्याही कुटुंबीयांना काहीच माहीत नव्हते. मात्र, एकेदिवशी या दोघांच्या प्रेमाची माहिती कुटुंबीयांना कळताच ते संतापले. मुस्कानच्या कुटुंबीयांना तिचा इतका राग आला की त्यांनी तिला बाहेर जाण्यास सक्त मनाई केली होती.
5 / 8
मुस्कान आणि साकिबच्या प्रेमाला त्यांच्या पूर्ण विरोध होता. दुसरीकडे, साकिब मुस्कानला भेटण्यासाठी आतुर होता. त्याने मध्यरात्री तिला भेटण्याचा बेत आखला आणि गुपचूप मुस्कानच्या घरी पोहोचला आणि तिच्या खोलीत शिरला. मुस्कानच्या कुटुंबीयांना सकाळी याची माहिती मिळाली आणि त्यांनी साकिबला बेदम मारहाण केली. तसेच, गुन्हा दाखल केला.
6 / 8
या प्रकरणावरून गोंधळ उडाला आणि दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. मुस्कान आणि साकिबच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण गावात रंगल्या. आता मुस्कानच्या कुटुंबीयांना दोघांनीही लग्न करावे, अशी इच्छा होती, पण साकिबच्या घरचे लोक तयार नव्हते.
7 / 8
मात्र गुन्ह्याची भीती आणि मुलगा तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे साकिबच्या कुटुंबीयांनी मुस्कानला सून म्हणून स्वीकारले. मुस्कान आणि साकिब दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलिसांनी मौलवींना तेथे बोलावले.
8 / 8
पोलीस स्टेशनमध्येच दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्यात आला आणि निकाह पार पाडण्याची परवानगी देण्यात आली. या दोघांची अशी लव्हस्टोरी ऐकून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, लहापणाचे प्रेम यशस्वी झाले.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल