नाकावर चष्मा अन् एक नजर...; ट्रम्पेटच्या एका ट्यूनने धुमाकूळ घालणारी ही तरुणी आहे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:37 IST2025-01-23T17:28:53+5:302025-01-23T17:37:01+5:30
सोशल मीडियावर ट्रम्पेट वाजवणारी ही तरुणी सध्या धुमाकूळ घालतेय. तिच्या ट्रम्पेट वाजवण्यावर आणि तिच्या एका नजरेवर अनेकांनी सध्या जीव ओवाळून टाकलाय. पण नक्की ही तरुणी आहे तरी कोण?

व्हायरल होत असलेल्या तरुणीचा हा व्हिडीओ चीनमधील असून ती एका लाईव्ह शोदरम्यान ट्रम्पेट वाजवत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ती रातोरात व्हायरल झाली आहे.
या तरुणीचा व्हिडीओ सर्वात आधी चिनी अॅप We Chat वर अपलोड करण्यात आला होता. तिथून नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ कॉपी करुन इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की सर्वजण या तरुणीचा इन्स्टाग्राम आयडी आणि तिचे नाव शोधायला लागले.
ट्रम्पेट वाजवाता व्हायरल होणाऱ्या या तरुणीचे नाव Gao Yifei असं आहे. चीनमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर बंदी असल्यामुळे अनेकांना तिची प्रोफाईल शोधता आलेली नाही. चीनकडे स्वतःचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे इतर अॅप्सना बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, लोकप्रिय सोशल मिडिया हँडलवर Gao Yifei ची प्रोफाईल नसल्यामुळे तिचं नाव Zhao Lie असल्याचे म्हणत ट्रम्पेट वाजवणारे व्हिडीओ व्हायरल केले जात होते.
Zhao Lie हा चीनमधला प्रसिद्ध गायक असून व्हायरल होणारी Gao Yifei ही त्यांच्या बॅण्डमध्ये आहे.
Gao Yifei चा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती ज्या गाण्यासाठी ट्रम्पेट वाजवत आहे ते टाईम ऑफ अव्हर लाईव्ह आहे. मात्र तिच्या ट्रम्पेट वाजवण्याआधी तारारारारा असा आवाज येतो म्हणून हे गाणं Tarararara नावानं लोकांनी अपलोड केलं आहे.
Times of Our Lives हे गाणं Zhao Lie याचं असून ते २०१५ साली आलं होतं. त्यावेळीही हे प्रसिद्ध होतं. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कॉन्सर्ट दरम्यान Gao Yifei ने ही ट्यून वाजवली आणि जगभरात प्रसिद्ध झाली.