नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:59 IST
1 / 5सोशल मीडियाच्या काळात एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होणे कठीण नाही. एकामागोमाग येणारे, गाजणारे ट्रेंड हा त्याचाच एक भाग. सध्या हळदीचा ट्रेंड सुरु आहे. जो उठतो तो काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात चमचाभर हळद टाकत आहे. तो ग्लास मोबाईलच्या टॉर्च लाईट वर ठेवून खोलीत अंधार केल्याने ग्लासमध्ये टप्प्याटप्प्याने उतरणारी हळद एखाद्या जादूसारखी दिसते. लहान मुलांना त्याचे कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे, पण मोठेही हा ट्रेंड इतक्या मोठ्या संख्येने फॉलो करत आहेत. ते पाहता 'भारतातली हळद अशीच संपणार बहुतेक' असे उपहासात्मक विनोदही येऊ लागले आहेत.2 / 5मात्र या ट्रेंडवर आक्षेप घेत एका ज्योतिषाने लोकांना सावध करत हा ट्रेंड ताबडतोब थांबवा असा इशारा दिला आहे. कारण हा ट्रेंड नसून ही एक 'मांत्रिक' क्रिया आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्यावर आणि तुमच्या घरावर संकट ओढावून घ्याल, असा इशारा दिला आहे. 3 / 5ज्योतिषी अरुण कुमार व्यास सांगतात, 'हळदीचा हा ट्रेंड एक मांत्रिक प्रक्रिया आहे. मांत्रिक लोक भूत, प्रेत, आत्मे बोलावण्यासाठी या तंत्राचा उपयोग करतात. रात्रीच्या अंधारात हा ट्रेंड करून पाहिल्याने नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आणि तुमच्या वास्तू कडे आकर्षित होऊ शकते. ज्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर भूतबाधा होण्याचीही शक्यता टाळता येत नाही, असे ते म्हणतात. 4 / 5अशा पद्धतीने हळद पाण्यात टाकल्याने तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरु बळ कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. व्यास सांगतात, ही पूर्णपणे हानिकारक प्रक्रिया आहे, जी तुमच्या घरात आपत्ती आणू शकते. म्हणून, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. 5 / 5सदर माहिती व्हिडीओच्या आधारे दिलेली असून लोकमत सदर माहितीला पुष्टी देत नाही.