Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:04 IST
1 / 10ऐन गणेशोत्सवात केलेल्या एका व्हिडीओमुळे रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एका मूर्तिकाराकडे अथर्व सुदामे गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी जात असल्याचं दाखवलं गेलं होतं. 2 / 10पण नंतर तो मूर्तीकार मुस्लीम असल्याचं समजतं. तो मूर्तीकार अथर्वला दुसऱ्या मूर्तीकाराकडून मूर्ती खरेदी करण्याचा सल्ला देतो. पण, अथर्व त्याच्याकडूनच मूर्ती खरेदी करतो.3 / 10तो म्हणतो, 'माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीर खुरमाही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील.4 / 10या रीलवरुन अथर्व सुदामेवर टीका होत आहे. नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या रीलमुळे अथर्व सुदामेला ट्रोल केलं जात आहे. 5 / 10अथर्वने हा व्हिडीओ डिलीट करून चाहत्यांची माफीही मागितली आहे. एका व्हिडीओमुळे ट्रोल झालेला अथर्व सुदामे नक्की कोण आहे? चला जाणून घेऊया6 / 10अथर्व सुदामे हा मुळचा पुण्याचा आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून त्याने प्रसिद्धी मिळवली. 7 / 10त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. इन्स्टाग्रामवर अथर्वचे १.७ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर युट्यूबवर १.३२ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. 8 / 10अथर्वच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्याने कॉमर्समधून पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयाची आवड म्हणून त्याने रील्स बनवायला सुरुवात केली होती. 9 / 10याच रील्समुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. अनेक सेलिब्रिटींसोबतही त्याने रील्स व्हिडीओ बनवले आहेत. पण, आता त्याच रील्समुळे त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. 10 / 10अथर्व सुदामेचं राज ठाकरेंनी कौतुकही केलं होतं. राज ठाकरेंच्या मनसेशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.