By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:24 IST
1 / 8पाकिस्तानचा माजी कर्णधार व लोकप्रिय क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याचे कारण त्याचे चौथे लग्न आहे.2 / 8सोशल मीडियावर अलिकडेच अशी चर्चा आहे की मलिक लवकरच पाकिस्तानी टेलिव्हिजन अभिनेत्री वनीजा सत्तारशी लग्न करू शकतो. काही वृत्तांनुसार, लग्नाची तारीख मार्च महिन्यातच असल्याचे म्हटले आहे.3 / 8शोएब किंवा वनीजा दोघांनीही या दाव्यांना दुजोरा किंवा नकार काहीच दिलेले नसले तरीही, या चर्चेमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. जर खरे असेल तर शोएब मलिकचे हे चौथे लग्न असणार आहे.4 / 8त्याने यापूर्वी आयेशा सिद्दीकी, टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि अलिकडेच अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. त्यानंतर आता शोएब मलिका चौथ्यांदा कबूल है म्हणणार असून ती तरुणी वनीजा असू शकते.5 / 8वनीजा सत्तार ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने मालिकांमध्ये काम केले असल्याने ती लोकप्रिय आहे. तसेच ती पाकिस्तानी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.6 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, हम टीव्हीवरील 'लाडली' या नाटकात नाझो नावाच्या गुंतागुंतीच्या आणि बिघडलेल्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेने ती प्रसिद्ध झाली. या भूमिकेने तिला पाकिस्तानमध्ये ओळख मिळवून दिली.7 / 8वनीजा ही मूळची कराची येथील आहे. तिने कराची विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. वनीजा ही अतिशय चांगल्या आणि आर्थिकदृष्ट्या सबळ कुटुंबातील मुलगी असून तिचे कुटुंब उच्चशिक्षित आहे.8 / 8सोशल मीडियावर वनीजा हिचे १,२७,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती वारंवार आई आणि बहिणीसोबत फोटो पोस्ट करते. मनोरंजन जगतात वनीजा वेगाने प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे.