फाड पावती! हजार रूपये भरूनही मास्क लावायला विसरला; अन् दुसऱ्या दिवशी भरला १० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:07 PM2021-04-20T20:07:51+5:302021-04-20T20:17:34+5:30

पहिल्यांदा दंड वसूल केल्यानंतर या माणसाला मास्क देण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मास्क न लावल्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्यात आली आणि जवळपास १० हजार रूपयांचे चालान कापण्यात आले.

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोना संक्रमणाच्या केसेसमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. अशा स्थिती संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून लोकांना मास्क लावण्याचं आवाहन केलं जात आहे. मास्क लावला नाही तर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मास्क लावला नाही म्हणून एका माणसानं एकदा १ हजार रूपये आणि नंतरच्या दिवशी १० हजारांचा दंड भरला आहे. उत्तर प्रदेशातील देवरियाच्या बरियापूर पोलिस स्थानक परिसरात महूआ गाववातील निवासी अमरजीत यादव हे रविवारी क्रेटा कारनं तोंडाला मास्क न लावता निवडणूक प्रचाराला निघाले.

मास्क लावला नसल्यामुळे पोलिसांनी त्यांचे चालानही कापले त्यावेळी अमरजीत यांना १००० रूपयांचा दंड भरावा लागला.

दंड भरल्यानंतरही त्यांनी पोलिसांची मास्क वापरण्याची विनंती गांभिर्यानं घेतली नाही. सोमवारी मास्क लावताच आपली कार घेऊन निघाले.

पुन्हा एकदा त्यांना पोलिस तपासणी अभियानादरम्यान पकडण्यात आलं. यावेळी त्यांनी धडा शिकवण्यासाठी या माणसाकडून पोलिसांनी १० हजार रूपयांचा दंड वसूल केला. उत्तर प्रदेशात अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी.

या तपासणीदरम्यान ३३१ लोकांकडून तीन लाख एकतीस हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात पहिल्यांदा दंड वसूल केल्यानंतर या माणसाला मास्क देण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मास्क न लावल्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्यात आली आणि जवळपास १० हजार रूपयांचे चालान कापण्यात आले.