भन्नाट! जगाची अशी बाजू ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल, हे पाहून म्हणाल, अरे बाप रे बाप....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:59 IST2020-02-21T15:34:55+5:302020-02-21T15:59:30+5:30
हे फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल की, खरंच असं असतं का? किंवा हे असं कसं?

जगात खूप गोष्टी अशा आहेत ज्यांबाबत आपल्याला माहीत नाही. याच माहीत नसलेल्या दुनियेची सफर करवणारे काही फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्ही विचारात पडाल की, खरंच असं असतं का? किंवा हे असं कसं?
हा फोटो पाहून असं वाटतं की, एकतर हा एखाद्या फरशीचा जवळून काढलेला फोटो असावा. पण हा फोटो कोणत्याही रस्त्याचा किंवा फरशीचा नाही तर नवी दिल्लीचा एरिअल व्ह्यू आहे.
हे ते ठिकाण आहे जिथे अॅमेझॉनची नदी आणि काळी नदी एकत्र येते. दोन वेगवेगळ्या रंगाच्या नद्या एकत्र आल्यावर असा नजारा दिसतो.
हे दुसरं तिसरं काही नसून Bookshelf आहे.
वेगवगेळ्या देशांच्या बॉर्डर कशा असतात हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेलच. पण या फोटोत आहे तशी नक्कीच पाहिली नसेल. या फोटोत बेल्जिअम आणि नेदरलॅंड या देशांची बॉर्डर आहे.
तुम्ही ज्या मोठ्या बॉटलमधून पाणी पिता ती एक लिटरची बॉटल तयार होण्याआधी अशी दिसते.
पाण्यात पुल तयार करण्यासाठी आधी अशाप्रकारे खांबांची जागा तयार केली जाते. पाणी ज्याप्रकारे अडवलंय ते आश्चर्यकारक आहे.
या फोटोतील चिम्पांजीची शेविंग करण्यात आली आहे. हा फोटो पाहिल्यावर तर नक्कीच हे वाटतं की, मनुष्य आणि चिम्पांजी नातेवाईक आहेत.
काही सिनेमांमध्ये हिरो स्वत: कार ड्राइव्ह करत नाहीत. पण ते ड्रायव्हर सीटवर बसलेले असतात. यावेळी कार वर बसलेला ड्रायव्हर चालवत असतो.
जादुगारांच्या शोमध्ये एका व्यक्तीचे दोन तुकडे केल्याचं दाखवलं जातं. पण ती ट्रिक नेमकी कशी असते ते या फोटो बघायला मिळतं.
घरात सामान नाही तर थेट घरच शिफ्टींग करणं सुरू आहे. सामानासाठी वेगळी गाडी सांगायचं टेन्शनच नाही.
नामीबियातील या ठिकाणी समुद्र वाळवंटाला येऊन मिळतो. सामान्यपणे असं चित्र फारच कमी बघायला मिळतं. त्यामुळे हा नजारा अद्बुत आहे.
पहिल्या नजरेत असं वाटतं की, यात कम्प्युटरचा मदरबोर्ड आहे. पण हा मदरबोर्ड नसून हा फोटो न्यूयॉर्क शहराचा आहे. रात्री न्यूयॉर्क इतकं सुंदर दिसतं.
आपल्याकडे कधी तरी तुम्ही पाहिलं असेल की, फुटपाथ कसे एक एक वीट लावून तयार केले जातात. पण परदेशात फुटपाथ असे तयार केले जातात.
विजेचे मोठाले टॉवर ज्याला लोक गमतीने रावण म्हणतात ते असे उभारले जातात. भारतात तर लोक एक एक रॉड जोडताना दिसतात.
सूर्याच्या डावीकडे एक छोटासा काळा ठिपका दिसतोय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तो बुध ग्रह आहे.