शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IND vs AUS : हा देश प्रत्येक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे का? पाकिस्तानी अभिनेत्रीची भारताच्या पराभवासाठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 6:34 PM

1 / 9
मागील जवळपास दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या वन डे विश्वचषकाचा आज अखेरचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर जगाला २०२३चा विश्वविजेता मिळेल.
2 / 9
यंदाच्या पर्वात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी केली. शेजाऱ्यांना केवळ चार सामने जिंकता आल्याने उपांत्य फेरीपासून दूर राहावे लागले.
3 / 9
पाकिस्तानी संघ स्पर्धेबाहेर गेल्यानंतर शेजारील देशातील माजी खेळाडू अजब विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.
4 / 9
भारतीय संघावर, खेळाडूंवर खालच्या पातळीवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा काही माजी पाकिस्तानी खेळाडूंचा मानस असतो. याबाबतीत शेजारील देशातील कलाकार मंडळी देखील मागे नाही.
5 / 9
पाकिस्तानातील अभिनेत्री सेहर शिनवारी तिच्या हास्यास्पद विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. आता तिने असेच एक अजब विधान केले असून विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव व्हावा यासाठी तिने प्रार्थना केली आहे.
6 / 9
उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले. त्या सामन्यापूर्वी शिनवारीने एक पोस्ट करत म्हटले होते की, न्यूझीलंड भारताचा दारूण पराभव करेल.
7 / 9
सेहर शिनवारी नेहमी अनोख्या पोस्ट करून प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात असते. तिने अलीकडेच केलेल्या पोस्टमध्ये लिहले की, भारतीय संघातील खेळाडू चांगला अभिनय करतात. त्यांना माहिती असते की सामना फिक्स आहे पण ते मुद्दाम सर्वांना कळू नये म्हणून नाटक करतात.
8 / 9
सेहर शिनवारीने पाकिस्तानातील अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती एका टीव्ही शोमध्येही काम करत आहे.
9 / 9
भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारताच तिने म्हटले, 'भारतीय संघ पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, हे सत्य मला पचनी पडत नाही. हा देश प्रत्येक गोष्टीत आमच्यापेक्षा पुढे का आहे? असो, पण त्यांचा अंतिम सामन्यात पराभव व्हावा यासाठी प्रार्थना करते.'
टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाPakistanपाकिस्तानTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ