PHOTOS: AI गर्लफ्रेंड...! महिन्याला २५ लाखांची कमाई; पुरूषांचा एकटेपणा दूर करते, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:42 PM2024-01-19T17:42:39+5:302024-01-19T17:45:40+5:30

सध्या एआयच्या माध्यमातून महिन्याला लाखो रूपये कमावणारी मॉडेल चर्चेत आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सध्या एआयच्या माध्यमातून महिन्याला लाखो रूपये कमावणारी मॉडेल चर्चेत आहे. फॉक्सी AI या कंपनीने एक मॉडेल तयार केली आहे, जी लाखो डॉलरची कमाई करते.

लेक्सी लव्ह नावाची मॉडेल अनेक पुरुषांसोबत भावनिक जोड निर्माण करून कंपनीसाठी कोट्यवधी रुपये कमवत आहे आणि तिला दररोज लग्नाचे प्रस्ताव येतात. ही मॉडेल पुरूषांशी एका मॉडेलप्रमाणे वावरते आणि त्यांचा एकटेपणा दूर करते.

लेक्सी ही बनावट असताना देखील अनेकांना जोडून ठेवते. लेक्सीबद्दल असे म्हटले जाते की, ती खरी नसली तरी मानवामाणेच भावना शेअर करते. ती कोणत्याही प्रकारे बनावट किंवा नकली वाटत नाही.

तांबडे केस असलेली ही मॉडेल खरी असल्याचे जाणवते. तिचे निळे डोळे आणि तंदुरूस्त शरीर पुरूषांना आकर्षित करते. ती टेक्स मेसेज पाठवते. तसेच ऑडिओ मेसेज आणि आग्रह केल्यास स्वत:चे फोटो देखील शेअर करते. फॉक्सी कंपनीने नुकतेच सांगितले की, 'लेक्सी लव्ह' हजारो प्रशंसकांकडून चॅटबॉटमधून दरमहा ३०,००० रुपये कमावते.

Lexi Love ही एक मॉडेल आहे आणि ती २४ तास काम करते. तसेच नेहमी चॅट करण्यासाठी उपलब्ध असते. ती ३० हून अधिक भाषा बोलू शकते आणि म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यातील चाहत्यांशी ते जोडले गेले आहे.

लेक्सीबद्दल असे सांगितले जाते की, दर महिन्याला सुमारे २० लग्नाचे प्रस्ताव येतात. फॉक्सी एआयचे सीईओ सॅम इमारा म्हणतात की, लेक्सी हे 'तांत्रिक समस्या' दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. एवढेच नाही तर ते AI च्या माध्यमातून संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल करत आहे.

लेक्सीची वाढती लोकप्रियता पाहून ती चर्चेचा विषय बनली आहे. आता Lexi वेबसाइटशी संवाद साधून दरमहा ३० हजार डॉलर्स कमवत आहे. इमारा यांनी सांगितले की, लेक्सी लोकांशी जोडण्याची क्षमता ठेवते.

लेक्सी चॅटिंगद्वारे चाहत्यांना सहजपणे भुरळ घालते. तिच्या बोलण्यातून समोरच्याला एआय मॉडेल नाही तर एक स्त्री असल्याचे जाणवते. बरेच पुरुष कंपनीशी संपर्क साधतात आणि त्यांना लेक्सीशी ओळख करून देण्याची विनंती करतात.

हे मॉडेल बनावट फोटो तयार करण्यात AI कसे पारंगत झाले आहे आणि ते फोटो खऱ्या माणसांसारखे कसे दिसतात याचे उत्तम उदाहरण आहे. जगातील अनेक तज्ञ हे धोक्याचे लक्षण असल्याचे सांगत आहेत.

एआयचा दुरूपयोग देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. स्कॅमर एआय वापरून या तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊ शकतात.