घटस्फोटानंतर पती-पत्नीचा ५०-५० चा फॉर्म्यूला, सर्व वस्तूंची अशी केली वाटणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:09 IST2019-11-13T14:00:41+5:302019-11-13T14:09:37+5:30

सामान्यपणे घटस्फोट झाल्यावर पतीकडून पत्नीला पोटगीची काही ठराविक रक्कम दिली जाते. अनेक सेलिब्रिटींचे घटस्फोट पाहिले तर त्यात पत्नींना कोट्यवधी रूपये आणि बंगले मिळालेले दिसतात. मात्र, पोटगीबाबतचा एक अनोखा किस्सा जर्मनीतून समोर आला आहे. येथील एका व्यक्तीच्या पत्नीने पतीला दगा दिला. नंतर कोर्टाने त्यांना वेगळं होण्याचा आदेश तर दिलाच सोबतच सर्व वस्तू अर्ध्या वाटून घेण्यासही सांगितले. आता पतीने अर्ध्या वस्तू कशा दिल्या असतील हे तुम्हीच बघा. (Image Credit : buzznick.com)