लॅपटॉपपासून ते LED बल्बपर्यंत, अशा १४ वस्तू ज्या NASA ने अंतराळवीरांसाठी तयार केल्या होत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:07 PM2019-04-19T16:07:50+5:302019-04-19T16:21:14+5:30

अंतराळात तंरगणाऱ्या लोकांना पाहून अनेकजण हा विचार करत असतील की, आपणही तिथे असायला पाहिजे. पण ही इच्छा पूर्ण होणे कठिण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही रोज अशा वस्तू वापरता ज्या अंतराळवीरांच्या वस्तू वापरता. नाही ना. NASA ने अंतराळवीरांसाठी काही वस्तूंचा शोध लावला होता. या वस्तू इतक्या लोकप्रिय झाल्या की, सामान्य लोकही सहजपणे वापरु लागले. चला मग जाणून घेऊ....

1. Memory Foam - याचा शोध नासाने लावला होता. याने अंतराळात लॅंडिंग दरम्यान अंतराळवीरांना जोरदार धक्का किंवा जखम होण्यापासून बचाव होत होता. आता लोक याचा वापर उशी, गादीमध्ये करतात. (Image Credit : Wikimedia)

2. Dust Busters - याचा शोध ग्रहावरील मातीचा नमुना घेण्यासाठी लावण्यात आला होता. आता लोक याचा वापर घराच्या आणि ऑफिसच्या स्वच्छतेसाठी करु लागले आहेत. (Image Credit : scoopwhoop.com)

3. Invisible Braces - NASA सोबत काम करणाऱ्या कंपनीने Translucent Ceramic चा शोध लावला होता. नंतर याचा वापर डेंटिस्ट Invisible Braces तयार करण्यासाठी करु लागले. (Image Credit : 3. Invisible Braces - NASA सोबत काम करणाऱ्या कंपनीने Translucent Ceramic चा शोध लावला होता. नंतर याचा वापर डेंटिस्ट Invisible Braces तयार करण्यासाठी करु लागले. (Image Credit : scoopwhoop.com)

4. Scratch-Resistant Lens - या लेन्सचा वापर NASA त्यांच्या अंतराळवीरांच्या हेल्मेटच्या Visors करतात. याने हेल्मेटवर स्क्रॅच येत नाही. आता या लेन्सचा वापर चष्मा तयार करणाऱ्या कंपन्या करु लागल्या आहेत. (Image Credit : scoopwhoop.com)

5. कृत्रिम अवयव - NASA ने त्यांच्या रोबोट्ससाठी Artificial Limbs तयार केले होते. याने त्यांचं काम सोपं होत होतं. याच्या शोधानंतर दिव्यांग लोकांचं आयुष्य बदललं होतं. आता याच्या माध्यमातून अनेकजण चालू लागले आहेत. (Image Credit : scoopwhoop.com)

6. Athletic Shoes - NASA ने एक Rubber Molding Process चा शोध लावला. याच्या माध्यमातून रबरला एकप्रकारे मोल्ड केलं जातं. आता याचा वापर Athletic Shoes तयार करण्यासाठी केला जातो. (Image Credit : scoopwhoop.com)

7. कॅमेरा फोन्स - NASA ने CMOS Sensors चा शोध लावला होता. याच्या मदतीने नासा एखाद्या ग्रहाचा हाय डेफिनेशन फोटो काढू शकत होते. हे सेन्सर अंतरिक्ष यानात लावलेले आहेत. या टेक्नॉलॉजीचा वापर कॅमेरा फोन्स तयार करण्यासाठी केला जातो. (Image Credit : scoopwhoop.com)

8. Water Purifiers - NASA याचा शोध अपोलो यानातील पाणी शुद्ध करण्यासाठी लावला होता. याला Charcoal Technology च्या नावाने ओळखले जाते. (Image Credit : scoopwhoop.com)

9. Wireless Headsets - याचा शोध अंतराळवीरांना चांगलं कम्युनिकेशन करता यावं म्हणूण लावला होता. (Image Credit : scoopwhoop.com)

10. Freeze Dried Foods - NASA ने अंतराळात पदार्थांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी या टेक्निकचा शोध लावला होता. आता याचा वापर फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्थ स्टोर करण्यासाठी करतात. (Image Credit : scoopwhoop.com)

11. Computer Mouse - एका स्पेसक्राफ्टमध्ये सगळीकडेच कॉम्प्युटर लावलेलं असतं. हे कॉम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी नासाने हे माउस तयार केले होते. आता हे सर्वजण वापरतात. (Image Credit : scoopwhoop.com)

12. Ear Thermometers - याचा शोध नासाने ताऱ्यांचं तापमान मोजण्यासाठी केला होता. ही इन्फ्रोपेड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आता हे थर्मामीटर प्रत्येक रुग्णालयात बघायला मिळतं. (Image Credit : scoopwhoop.com)

13. LED - LED चा शोध नासाने अंतराळात झाडं उगवण्यासाठी लावला होता. आता ही टेक्नॉलॉजी कमी वीज खर्च होणारे बल्ब तयार करण्यासाठी वापरली जाते. (Image Credit : scoopwhoop.com)

14. Portable Computer - नासाने Grid Compass नावाने आधी पोर्टेबल कॉम्प्युटरचा शोध लावला होता. हे सुद्धा अंतराळवीरांच्या कम्युनिकेशसाठी तयार केले होते. कमर्शिअल मार्केटमध्ये यात थोडे बदल करुन लॅपलॉप तयार केला.