By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:14 IST
1 / 9'बिग बॉस ओटीटी ३' मुळे चर्चेत आलेली 'वडापाव गर्ल' म्हणजेच चंद्रिका दीक्षित सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या मोठं वादळ आलं असून या कौटुंबिक ड्राम्याची चर्चा आता जगभर होत आहे. 2 / 9चंद्रिका आणि तिच्या पतीमध्ये सध्या उघडपणे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. युगम गेरा याने सोशल मीडियावर चंद्रिकाच्या अफेअरबद्दल भाष्य केलं. 3 / 9चंद्रिकानेही पतीविरुद्ध व्हिडीओ शेअर करत पुरावे सादर केले आहेत. आता युगम गेराचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो चंद्रिकाला थेट धमकी देताना दिसत आहेत.4 / 9नव्या व्हिडीओमध्ये चंद्रिका दीक्षितचा पती युगम गेरा दुकानाच्या मालकीहक्काबाबत बोलताना दिसत आहेत. त्याने व्हिडीओ शेअर करून चंद्रिकाला स्पष्ट धमकी दिली आहे की, तिला या दुकानाचा ताबा कधीच मिळणार नाही.5 / 9युगम गेरा म्हणतो, 'मी माझ्या दुकानात आलो आहे. हा व्हिडीओ मी चंद्रिकाच्या पेजवर टाकत आहे कारण सध्या या पेजचा एक्सेस माझ्याकडे आहे. कदाचित हा व्हिडीओ दोन मिनिटांत किंवा दोन तासांनंतर कधीही डिलीट होऊ शकतो.'6 / 9'मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. चंद्रिका, तू माझ्याकडून या दुकानाचा एक्सेस कधीच घेऊ शकणार नाहीस. तू पेजचा एक्सेस घे, पण दुकानाचा नाही. कारण हे दुकान मी सुरू केलं आहे आणि तुला घडवणाराही मीच आहे, हे लक्षात ठेव.'7 / 9युगमने रागाच्या भरात धमकी देत पुढे म्हटलं की, 'तू कोणासोबतही फिर, तुला हवं असेल तर त्याला तुझा नवीन बॉयफ्रेंड बनव, त्याच्यासोबत फिर... मला त्याने काहीही फरक पडत नाही. पण उद्या जर या दुकानात मला कोणी दुसरा दिसला, तर त्याचे पाय तोडेन.'8 / 9युगमने सर्वात आधी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यानंतर चंद्रिकाच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रिकाने ढासाढसा रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला. 9 / 9यात तिने दावा केला की, 'मी घर, बाळ आणि दुकान सर्व काही सांभाळत आहे, पण माझा पती मात्र दुसऱ्या कोणासोबत तरी आहे.' या आरोपांनंतर युगम गेरा याने पुन्हा समोर येत आपल्याकडेही चंद्रिकाच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा केला आहे.