लय भारी! ७० वर्षाच्या मराठमोळ्या आजींच्या रेसिपींची कमाल; YouTube ने सिल्वर बटन देऊन केला गौरव

By manali.bagul | Published: October 31, 2020 04:27 PM2020-10-31T16:27:48+5:302020-10-31T16:50:37+5:30

Inspirational Stories Marathi: या आजी ७० वर्षांच्या असूनही सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या आहेत.

आजकाल तरूण मुलं युट्यूब आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. अनेकजण शाळेत आणि कॉलेजमध्ये असूनही आपल्या कला दाखवून युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळवतात. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका मराठमोळ्या आजींच्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. या आजी ७० वर्षांच्या असूनही सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आजी वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसेपीज तयार करून यु-ट्यूबवर टाकतात. आता यु-ट्यबकडून या आजींना सिल्वर बटन मिळालं आहे. त्यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.

यु-ट्यबकडून सिल्वर बटन देऊन सन्मानित केल्यानंतर या आजी म्हणाल्या की, यु-ट्यूब काय आहे. याबाबत मला काहीच माहीत नव्हते. माझ्या रेसिपीज् सोशल मीडियावर शेअर करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. पण आता जर सोशल मीडियावर रेसिपी शेअर केली नाही तर मला खूप अस्वस्थ वाटतं.

या आजींचे नाव सुमन असून पारंपारिक मराठमोळे पदार्थ या आजी यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दाखवतात. या आजींच्या सबस्क्राबर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मराठमोळ्या पदार्थांच्या रेसिपी व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्हिव्हज मिळतात.

या आजींचे यु-ट्यूब चॅनेल बनवण्याची आयडिया नातू यश पाठक याची होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी व्हिडीओ तयार करायला सुरूवात केली.

या आजींची रेसीपी शूट करणारे कॅमेरामॅन, व्हिडीओ एडीटर आणि अपलोडर यांनी आजींना पावभाजी बनवण्याची विनंती केली होती. तेव्हापासून या आजींच्या यु-ट्यूब व्हिडीओजचा प्रवास सुरू झाला.

यशने सांगितले की, आधीपासूनच आम्हाला आजीची जेवण बनवण्याची पद्धत खूप आवडत होती. हाच विचार मनात ठेवून मार्च महिन्यात कारल्याच्या भाजीचा व्हिडीओ टाकून सोशल मीडिया चॅनेल चालवण्यास सुरूवात केली. एक व्हिडीओ टाकल्यानंतर लगेच नेटिझन्सनी आजीच्या रेसीपीजला डोक्यावर घेतलं. त्यानंतर आम्ही शेंगदाण्याची चटणी, हिरव्या भाज्या, वांगे यांसह इतर पारंपारिक रेसिपीज बनवायला सुरूवात केली आणि व्हिडीओ शुट करून यु-ट्यूबवर अपलोड केले.( Image Credit- Indiatimes.com)