४ वर्ष रिलेशनशिप, गर्लफ्रेंडनं केला विश्वासघात?; 'IIT बाबा'च्या कहाणीतील ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:15 IST2025-01-16T13:04:34+5:302025-01-16T13:15:53+5:30

महाकुंभ मेळ्यात सध्या आयआयटीवाले बाबाची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांचं नाव अभय सिंह असून ते मूळचे हरियाणातील झज्जर येथील रहिवासी आहेत.
IIT मुंबईतून एयरोस्पेसमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. आता सोशल मीडियात त्यांचे फोटो व्हाटरल होत आहेत.
अभय सिंह स्वत:ला साधू संत अथवा महंत मानत नाहीत. आतापर्यंत अभय सिंह यांनी दिक्षा घेतली नाही. एका मुलाखतीत अभय सिंह यांनी मी मुक्त आहे आणि काहीही करू शकतो असं सांगितले.
आयआयटी शिक्षण घेताना कायम माझ्या मनात प्रश्न असायचा आणि आता यानंतर पुढे काय करायचे असं अभय सिंह म्हणतात.
आयआयटीचं शिक्षण घेतल्यानंतर मी कुठल्या तरी कंपनीत काम करेन आणि पैसे कमावेन परंतु मला त्यातून खरेच शांती मिळू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅम्पेस मुलाखतीत ते बसले होते. त्यात सिलेक्शन झाले. त्यानंतर एका कंपनीकडून त्यांना लाखोंच्या पॅकेजची नोकरी ऑफर आली. ती नोकरी काळ अभय सिंह यांनी केली.
मुलाखतीत अभय सिंह यांनी त्यांच्या लव्ह लाईफबाबतही सांगितले. माझीही गर्लफ्रेंड होती. आम्ही ४ वर्षापासून सोबत होतो. परंतु लग्नापर्यंत ते पोहचले नाही. मी आई वडिलांशी भांडून लग्न करू इच्छित नव्हतो. आयुष्यात सारखे वादच होत असतात त्याचा विचार करत आपण एकटेच राहिलेले बरे, आनंदी राहू असं अभय सिंह यांना वाटले.
माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगामुळे आयुष्यावर परिणाम झाला त्याचमुळे मी लग्न केले नाही. सततची भांडणे करण्यापेक्षा मी एकटा राहणे चांगले असं वाटायचे. माझी गर्लफ्रेंड होती परंतु ते संबंध कसे जपायचे हे तिला माहिती नव्हते असं त्यांनी सांगितले.
मी एकदा फिल्म बनवली आणि लहानपणाच्या आठवणींना ताज्या केल्या. ज्या नात्यात भावना नाहीत ती नाती संपवली असं अभय सिंह यांनी सांगितले.
सोशल मीडियात विविध दावे - अभय सिंह यांना प्रेमात विश्वासघात मिळाल्यानंतर त्यांनी सर्व मोहमाय त्याग करून ईश्वर सेवेत लीन झाले. काही जण सांगतात, बेरोजगारीमुळे अध्यात्मिकतेच्या दिशेने गेले परंतु अध्यात्माचं खरे कारण काय हे स्वत: अभय सिंह यांनाच माहिती आहे.