शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर लगेच लघवीला न जाणं पडू शकतं महागात, कसं? ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:59 PM

1 / 9
अनेकदा काही लोक शारीरिक संबंध ठेवल्यावर लगेच झोपी जातात. त्यांना ना प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेचं महत्त्व समजत ना ते लघवीला जात. अनेकांना हे माहीतच नसतं की, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवीला न जाणे त्यांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक होऊ शकतं.
2 / 9
महिलांनी याची खास काळजी घ्यायला हवी, कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांना यूरिन इन्फेक्शनची समस्या अधिक होते. त्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव करायचा असेल तर शारीरिक संबंधानंतर लगेच लघवीला जावे.
3 / 9
बॅक्टेरियाचा धोका - महिलांच्या मूत्राशयामध्ये बॅक्टेरिया सहजपणे प्रवेश करु शकतात. कारण त्यांच्या मूत्रमार्गाचा आकार लहान असतो. अनेक महिला शारीरिक संबंध ठेवल्यावर मूत्रमार्गात संक्रमण झाल्याची तक्रार करतात.
4 / 9
होतं असं की, पुरुषांमध्ये वीर्य आणि मूत्र एकाच मार्गे बाहेर येतं. त्यामुळे यूरिन इन्फेक्शन शारीरिक संबंधाच्या माध्यामतातून महिलांच्या गुप्तांगात परसतं. अशात जोडीदाराला कंडोमचा वापर करायला सांगणे फायद्याचे ठरेल.
5 / 9
यूटीआयचा धोका - यूरिन ट्रॅक इन्फेक्शन महिलांमध्ये अधिक प्रमाणात होतं. जर तुम्हाला सतत याचा सामना करावा लागत असेल तर याचं कारण तुम्ही शारीरिक संबंधानंतर लघवीला न जाणे हे असू शकतं. शारीरिक संबंधाचा आनंद घेण्यासाठी लघवी न करणे अनेकदा त्रासाचं ठरु शकतं.
6 / 9
आळस करु नका - शारीरिक संबंधाआधी लघवी करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जात नसाल तर हे चुकीचं आहे. फोरप्लेमध्ये इकतेही गुंतू नका की, लघवीला जाण्याचा कंटाळा कराल. शारीरिक संबंधाच्या आधी किंवा नंतर तुमची ही आळस करण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते.
7 / 9
एकदा लघवी करा आणि नंतर शारीरिक संबंधाचा मनसोक्त आनंद घ्या. हे लक्षात ठेवा की, शारीरिक संबंध ठेवल्यावर साधारण ३० मिनिटात लघवी न केल्याने संक्रमणाचा धोका वाढतो.
8 / 9
लघवी करणे फायद्याचं कसं? - शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने संक्रमणाचा धोका टळतो. महिलांनी शारीरिक संबंधाच्याआधी आणि नंतर गुप्तांगाची चांगल्याप्रकारे स्वच्छता करायला हवी. कारण त्यांनाच संक्रमण होण्याचा धोक अधिक असतो.
9 / 9
जेव्हा महिलांना यूटीआयसारखं संक्रमण सतत होत असेल त्यावेळी पुरुषांनी कंडोमचा वापर करावा. महिलांचा मूत्रमार्ग आणि प्रजनन मार्ग दोन्हीही वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराला संक्रमण होण्याचा धोका कमी असतो.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्स