साता-यात कृष्णा नदीला भाविकांनी नेसवली 750 मीटर लांबीची साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:32 IST2017-09-13T17:25:54+5:302017-09-13T17:32:22+5:30

साता-यातील क-हाड नगरीत कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कृष्णामाईला 750 मीटर लांबीची साडी भाविकांनी नेसवली

125 साड्यांपासून बनवली 750 मीटर लांबीची साडी

कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पडली पार

साडी नेसवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने बोट उपलब्ध करुन देण्यात आली होती

हजारो भाविकांनी कृष्णामाई घाटावर याची देही याची डोळा अनुभवला सोहळा

साडीचे एक टोक सैदापूर नदीपात्राकाठी होते, तेथून क-हाडच्या कृष्णानदीकाठावर साडीचे दुसरे टोक आणण्यात आले

भाविकांनी नदीची पूजा करून दीपप्रज्वलन करुन आरतीही केली