Women's Day 2026 : स्वत:ला भेट द्या ‘कोरियन कानातले’, पाहा १० नाजुक सुंदर डिझाइन्स - पाहूनच पडाल प्रेमात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 15:12 IST2026-03-05T15:02:04+5:302026-03-05T15:12:32+5:30
Women’s Day Special Korean Earrings Design : korean earrings for women : कोरियन स्टाईल कानातले हे हलके, स्टायलिश आणि कोणत्याही आउटफिटवर सहज शोभून दिसतात...

Women’s Day Special Korean Earrings Design
महिलांना दागिन्यांची विशेष आवड असते आणि सध्या फॅशनमध्ये कोरियन ज्वेलरीचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. या महिला दिनी तुमच्या नेहमीच्या लुकला हटके आणि ग्लॅमरस टच देण्यासाठी सुंदर, नाजूक कोरियन इअररिंग्स. आहेत बेस्ट पर्याय... स्टायलिश पर्ल ड्रॉप्सपासून ते मिनिमलिस्टिक फ्लोरल स्टड्सपर्यंत, हे युनिक डिझाईन्स प्रत्येक स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतील... हेव्ही आणि बटबटीत दागिन्यांची ओझी सोडा आणि या जागतिक महिला दिनानिमित्त स्वतःलाच भेट (korean earrings for women) द्या हे वजनाने हलके आणि दिसायला क्लासी असणारे ट्रेंडिंग कोरियन इअररिंग्स...

आजकल फॅशनच्या बाबतीत 'कोरियन ड्रामा' (K-Dramas) आणि 'के-पॉप' (K-Pop) यांनी जगभरातील तरुणाईला वेड लावले आहे. केवळ गाणी किंवा स्टोरीच नाही, तर त्यांची फॅशन सेन्स देखील तितकाच चर्चेत आहे. यात सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग ठरत आहेत, ते म्हणजे 'कोरियन कानातले' (Korean Earrings).

फॅशनच्या दुनियेत सध्या कोरियन ज्वेलरी ट्रेंड खूपच लोकप्रिय झाला आहे. साधेपणा, नाजूक डिझाईन आणि एलिगंट लुक ही कोरियन दागिन्यांची खासियत मानली जाते. विशेषतः कोरियन स्टाईल कानातले (Earrings) हे हलके, स्टायलिश आणि कोणत्याही आउटफिटवर सहज शोभून दिसणारे असतात.

ऑफिस, कॉलेज, कॅज्युअल आउटिंग किंवा पार्टी — प्रत्येक प्रसंगासाठी कोरियन कानातल्यांचे वेगवेगळे सुंदर डिझाईन्स बाजारात पाहायला मिळतात. छोटे स्टड्स, पर्ल डिझाईन, मिनिमल हूप्स किंवा डॅंगलर स्टाईल असे अनेक पर्याय आजकाल तरुणींमध्ये ट्रेंडिंग आहेत.

जड आणि भडक दागिन्यांपेक्षा हलके, चमकणारे आणि कोणत्याही आऊटफिटवर शोभून दिसणारे हे कानातले आजच्या मॉडर्न स्त्रियांची पहिली पसंती बनले आहेत. ऑफिस वेअर असो, कॅज्युअल लूक असो किंवा एखादी पार्टी, कोरियन कानातले तुमच्या सौंदर्याला एक वेगळाच 'क्लासी' टच देतात.

जर तुम्हालाही साधे पण आकर्षक दागिने घालायला आवडत असतील, तर कोरियन सुंदर नाजूक कानातले डिझाईन्स नक्कीच तुमच्या कलेक्शनमध्ये असायला हवेत.

लहान रंगीबेरंगी फुले, पाने किंवा फुलपाखरांचे डिझाईन्स असलेले स्टड्स. हे दिसायला अतिशय 'क्युट' आणि फेमिनिन वाटतात.

क्रिस्टल टॅसल इअररिंग्स पार्टी किंवा फंक्शनसाठी हे डिझाईन उत्तम आहे. चमकणारे छोटे खडे किंवा क्रिस्टल्सच्या अनेक पट्ट्या खाली लटकत असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.

त्रिकोण, वर्तुळ किंवा चौरस अशा साध्या पण स्टायलिश आकाराचे कानातले, हे वेस्टर्न कपड्यांवर अतिशय प्रोफेशनल दिसतात.

कोरियन इअररिंग्स हे वजनाने अत्यंत हलके असतात, त्यामुळे दिवसभर घातले तरी कान दुखत नाहीत. हे साडी, कुर्ती, जीन्स किंवा गाऊन अशा सर्व प्रकारच्या कपड्यांवर मॅच होतात.

कोरियन इअररिंग्स हे दिसायला महागडे वाटत असले तरी ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात.

















