तापत्या उन्हाळ्यातही शरीर आतून गारेगार ठेवणारं फळ, फायदे वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:17 IST2025-03-11T15:33:41+5:302025-03-11T16:17:31+5:30

Wood Apple Benefits : वरून कठोर आणि आतून मुलायम असलेल्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही या फळाचे शरीराला होणारे फायदे वाचाल तर या दिवसात रोज हे फळ खाल.

Benefits of wood apple: आंबट-गोड लागणारं बेल फळ उन्हाळ्यात भरपूर खाल्लं जातं. बेल फळ खूप थंड असतं, त्यामुळे उन्हाळ्यात बरेच लोक हे फळ शरीर आतून थंड ठेवण्यासाठी खातात. इतकंच नाही तर या दिवसात या फळाचा ज्यूसही पिऊ शकता. वरून कठोर आणि आतून मुलायम असलेल्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही या फळाचे शरीराला होणारे फायदे वाचाल तर या दिवसात रोज हे फळ खाल.

आता तापमान हळूहळू वाढायला सुरूवात होणार आहे. एकदा का तापमान वाढलं तर शरीराची लाही-लाही होऊ लागते. उन्हामुळे शरीरात डिहायड्रेशनची होतं. बेल फळामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हे खाल्ल्यावर शरीर हायड्रेट राहतं आणि शरीराचं तापमान कंट्रोल होतं. बेल फळ खाल्ल्यानं थंड वाटतं.

बेल फळामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. मेनोपॉज दरम्यान महिलांनी हे फळ खावं. कारण यादरम्यान त्यांची बोन डेंसिटी कमजोर होऊ लागते.

वेगवेगळ्या कारणांनी जर पोट बिघडलं असेल, पोट साफ होत नसेल अशांसाठी हे फळ खूप फायदेशीर ठरतं. या फळानं अॅसिडिटी दूर होते आणि पचनही चांगलं होतं. उन्हाळ्यात बेलाच्या गराचा ज्यूस करून त्याता काळं मीठ टाकून प्यावं. पोटासंबंधी समस्या दूर होईल.

वरील फायद्यांसोबतच बेलाचं फळ हे वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरतं. यात फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे पोटावर वाढलेली चरबी सहज कमी होते. जर २५० मिली बेलाचा ज्यूस प्याल तर यात १५० कॅलरी असतात. हे वर्कआउटनंतर एनर्जी ड्रिंकसारखं काम करतं. यानं ब्लोटिंग होत नाही.

बेल श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही फायदेशीर ठरतं. यानं ब्रोन्किअल मसल्स रिलॅक्स होतात, ज्यामुळे श्वास घेणं सोपं होतं. ज्या लोकांना श्वाससंबंधी समस्या आहे, त्यांनी नियमितपणे हे फळ खावं.

बेलामध्ये बीटा-कॅरोटीन असतं, जे लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवतं. ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या असेल त्यांना यानं अधिक फायदा मिळतो. बेलामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढतं. अशात वेगवेगळ्या आजारांचा धोकाही कमी होतो.