इंडक्शनचा आकार चौकोनीच का असतो ? फक्त डिझाइन म्हणून नाही तर 'ही' आहेत ६ कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 10:00 IST2026-03-17T10:00:00+5:302026-03-17T10:00:02+5:30

why induction cooktop is square not round : why induction cooktop is not round : इंडक्शन कुकटॉपचा आकार बहुतेक वेळा चौकोनीच असतो कारणं...

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे परिणाम सध्या जगभरात इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडले असून गॅस पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. आज गॅस एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. या 'एलपीजी' (LPG) संकटावर मात करण्यासाठी आणि स्वयंपाकघरातील इंधन वाचवण्यासाठी सध्या बहुतेकजण इंडक्शन शेगडी वापरण्याचा पर्याय निवडत आहेत(why induction stove is square).

इंडक्शनवर स्वयंपाक करणं सोपं, जलद आणि सुरक्षित (why induction cooktop design is square) मानलं जातं. मात्र इंडक्शन वापरताना अनेकांच्या मनात एक मजेशीर प्रश्न नक्कीच येतो - इंडक्शन कुकटॉपचा आकार बहुतेक वेळा चौकोनीच का असतो? गोल किंवा इतर आकार का नसतात? ते पाहूयात...

इंडक्शन कुकटॉपमध्ये आतमध्ये कॉपर कॉइल, सर्किट बोर्ड आणि कूलिंग फॅन असतो. हे सर्व भाग व्यवस्थित बसवण्यासाठी चौकोनी किंवा आयताकृती आकार सर्वात सोयीचा ठरतो. इंडक्शन मधील सर्व इलेक्ट्रॉनिक घटक एका कोपऱ्यात किंवा विशिष्ट क्रमाने बसवण्यासाठी चौकोनी जागा जास्त सोयीस्कर ठरते. गोलाकार आकारात हे सर्व सुटे भाग सुरक्षितपणे बसवणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आणि खर्चिक असते.

इंडक्शन दीर्घकाळ वापरल्यास त्यातील अंतर्गत भाग गरम होतात. हे भाग थंड ठेवण्यासाठी खाली किंवा बाजूला एक एक्झॉस्ट फॅन (Fan) दिलेला असतो. चौकोनी आकारामुळे या फॅनला हवा खेळती ठेवण्यासाठी पुरेशी जागा मिळते, ज्यामुळे इंडक्शन 'ओव्हरहीट' होत नाही.

स्वयंपाकघरातील ओट्यावर इंडक्शन ठेवताना त्याचा आकार चौकोनी असल्यास तो कमी जागेत व्यवस्थित बसतो. तसेच, चौकोनी पृष्ठभागावर मोठी भांडी किंवा कढई ठेवली तरी तिचा तोल जाण्याची शक्यता कमी असते. गोलाकार इंडक्शनवर मोठे भांडे ठेवल्यास ते एका बाजूला झुकण्याची भीती असते.

काचेच्या किंवा सिरॅमिकच्या शीट कापताना चौकोनी आकारात कापणे जास्त सोपे आणि स्वस्त पडते. गोलाकार आकार कापताना काच वाया जाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे इंडक्शनची किंमत वाढू शकते.

इंडक्शनवर टच बटणं, डिस्प्ले आणि कंट्रोल पॅनल असतात. चौकोनी डिझाइनमध्ये हे सर्व व्यवस्थित बसवणं सोपं होतं.

चौकोनी बेस असल्यामुळे इंडक्शन टेबल किंवा किचन काउंटरवर अधिक स्थिर राहतो. गोल आकार असल्यास तो हलण्याची किंवा सरकण्याची शक्यता जास्त असते.