गावाकडून पोतंभर गहू आणले, पण कीड लागली तर? ७ टिप्स- वर्षभर गव्हाला लागणार नाही कीड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 20:00 IST2026-04-07T20:00:00+5:302026-04-07T20:00:03+5:30

Storing grains in airtight containers: How to get rid of weevils in wheat: गव्हाला कीड लागण्यापासून वाचवणाऱ्या ७ नैसर्गिक उपाय लक्षात ठेवले तर गहू खराब होणार नाही.

अनेकदा आपण घरात जास्तीचे सामान भरून ठेवतो. उन्हाळा सुरु झाला की गावाकडे जाणं अनेकांच होतं. गावाकडून पोतंभर गहू येणं म्हणजे वर्षभराची सोय होणं. शेतातून आलेला हा गहू चवीला गोड आणि पौष्टिक असतो. पण उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की, हवेतील ओलाव्यामुळे गव्हाला कीड, अळ्या किंवा सोंडे लागण्याची भीती निर्माण होते.(Storing grains in airtight containers)

गव्हाला कीड लागू नये म्हणून आपण बाजारातून अनेक रासायनिक गोळ्या आणतो पण या आरोग्यासाठी अधिक घातक असतात. पण गव्हाला कीड लागण्यापासून वाचवणाऱ्या ७ नैसर्गिक उपाय लक्षात ठेवले तर गहू खराब होणार नाही. (How to get rid of weevils in wheat)

गहू डब्यात भरण्यापूर्वी तो किमान २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवावा. गव्हात थोडाही ओलावा राहिला, तर त्याला लगेच कीड लागते. उन्हामुळे गव्हातील आर्द्रता कमी होते आणि तो दीर्घकाळ टिकतो.

गव्हाच्या डब्यात तळाला, मध्ये आणि वर सुकलेला कडुलिंबाचा पाला घाला. कडुलिंबाच्या कडवट वासामुळे कीड आणि अळ्या गव्हाच्या जवळही येत नाहीत.

गव्हाच्या डब्यात २ ते ३ काड्यापेट्या उघड्या करुन घाला किंवा काड्यांचे टोक गव्हात विखरुन ठेवा. काडेपेटीच्या असलेल्या गंधकामुळे किडे गव्हात शिरकाव करत नाहीत.

तमालपत्र आणि लवंगांचा उग्र वास किड्यांना सहन होत नाही. गव्हाच्या पोत्यात किंवा डब्यात ५ ते १० तमालपत्र आणि लवंग घातल्यास कीड लागत नाही.

गव्हाला थोडं मोहरीचे तेल किंवा हळद लावून ठेवल्यास गव्हाला पॉलिश मिळते आणि एक संरक्षक कवच तयार होते. यामुळे कीडे, मुंग्या किंवा अळ्या लागत नाही.

गव्हात थोडे खडे मीठ मिसळून ठेवल्यास ओलावा शोषला जातो. मीठ हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, ज्यामुळे गहू खराब होत नाही.

गहू साठवण्यासाठी नेहमी स्टील किंवा प्लास्टिकचा हवाबंद डबा वापरावा. डबा जमिनीपासून थोडा उंचावर आणि कोरड्या जागी ठेवावा. डब्याला ओला हात लावू नका.