नारळ पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास काय होतं? उन्हाळ्यात या प्रश्नाचं उत्तर माहिती हवंच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:51 IST2025-04-15T11:32:01+5:302025-04-15T11:51:47+5:30
Coconut Water and Lemon : हे दोन्ही ड्रिंक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर हे दोन्ही ड्रिंक एकत्र करून प्याल तर याचे डबल फायदे शरीराला मिळतात.

Coconut Water and Lemon : उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी, शरीर आतून थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक गारेगार नारळाचं पाणी आवर्जून पितात. नारळ पाणी कोणत्याही सीझनमध्ये भरपूर पितात, पण उन्हाळ्यात ते जास्त प्यायलं जातं. तसेच एनर्जीसाठी, इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणीही भरपूर प्यायलं जातं. हे दोन्ही ड्रिंक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर हे दोन्ही ड्रिंक एकत्र करून प्याल तर याचे डबल फायदे शरीराला मिळतात. अशात नारळ पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
पचन सुधारतं
लिंबाच्या रसामुळे पचनासाठी आवश्यक द्रव्य अॅक्टिव होतं आणि नारळाचं पाणी आतड्यांना शांत करतं. या खास कॉम्बिनेशननं गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंग या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
त्वचेसाठी फायदेशीर
नारळ पाणी आणि लिंबू दोन्हींमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात, जे शरीरातून विषारी तत्व बाहेर काढतात. ज्यामुळे स्किनवर ग्लो येतो, पिंपल्सची समस्या दूर होते आणि स्किन हायड्रेट राहते.
वजन कमी होतं
लिंबाच्या रसानं शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि नारळ पाण्यात कॅलरी कमी असतात. तसेच हे ड्रिंक भूकेला कंट्रोल करतं आणि फॅट बर्निंगच्या प्रोसेसला सपोर्ट करतं. ज्यामुळे वजन लवकर कमी होतं.
शरीर राहतं हायड्रेट
नारळ पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स जसे की, पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर असतात. जे उन्हाळ्यात घामातून गेलेले मिनरल्स परत देतात. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे शरीराला एनर्जी देतं.
इम्यूनिटी वाढते
लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि नारळ पाण्यातील मिनरल्सनं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि वायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
कसं प्याल?
एक ग्लास फ्रेश नारळ पाणी घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. हवं तर त्यात थोडं काळं मीठ किंवा पदीना टाकू शकता. यानं ड्रिंकची टेस्ट आणखी वाढले. हे ड्रिंक तुम्ही सकाळी उपाशीपोटी आणि दुपारच्या जेवणानंतर १ तासांनी पिऊ शकता.