Sambhaji Maharaj : शंभूराजांची दूध आई वीर धाराऊ, स्वराज्याचा वंश त्यांनी जगवला! त्यांचे वंशज आता कुठं असतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 11:52 IST2025-03-12T16:25:41+5:302025-03-29T11:52:09+5:30

Sambhaji Maharaj : Veer Dharau, kept alive the lineage of Swarajya! Where are her descendants now? : पोटच्या मुलाप्रमाणे शंभूराजांवर माया करणारी माऊली . पाहा कोण होत्या या वीर धाराऊ.

छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि समर्पण केवळ अद्भूत. त्यांच्यासोबतच नाव येतं त्यांची दूध आई धाराऊचं.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. शंभूराजे हे सईबाईंचे पुत्ररत्न. राजेंच्या जन्मादरम्यान सईबाईंची प्रकृती अगदीच खालवली होती. त्या नंतर खूप आजारी पडल्या.

नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे अमृत. पण शंभूराज्यांना दूध पाजण्याएवढीही ताकद सईबाईंमध्ये नव्हती.

बाळाला दूध तर पाहिजे म्हणून जिजामातांनी काहीतरी पर्याय शोधायचे ठरवले. त्यांनी तातडीने धाराऊ गाडे यांना निरोप पाठवला.

पुरंदरच्या पायथ्याशी कापुरहोळ नावाचे एक गाव आहे. त्या गावात तुकोजी गाडे पाटील हे गृहस्थ राहत होते. त्यांची पत्नी म्हणजे धाराऊ गाडे पाटील ज्यांना आपण दूध आई म्हणून ओळखतो.

धाराऊंना जिजामातांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. धाराऊंना त्यांनी शंभूराज्यांनाही दूध पाजा असे सांगितल्यावर, धाराऊंनी अत्यंत मायेने जिजाऊंचे म्हणणे मान्य केले.

नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराज्यांनाही पाजले. सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराज्यांचा सांभाळ केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना दरवर्षी १६ होनांची तैनाती दिली. धाराऊंच्या मुलाला स्वराज्याच्या सेवेत सहभागी करून घेतले.

छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात. धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या. ( माहिती संदर्भ : https://www.youtube.com/shorts/SC0nlOa_SXE)