फक्त १ चमचा चहा पावडरची कमाल! केस खूप पटापट वाढतील- काही दिवसांतच दाट, लांब होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 12:00 IST2025-12-29T11:51:33+5:302025-12-29T12:00:44+5:30

केसांची अजिबातच वाढ होत नसेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा..

हा उपाय केल्याने केसांची चांगली वाढ तर होईलच, पण केस गळणं थांबून ते दाट, जाडही होतील.

एका भांड्यामध्ये १ चमचा तांदूळ घाला. तांदळामध्ये अमिनो ॲसिड्स असतात जे तुमच्या केसांना खूप छान पोषण देऊन त्यांना चमक देतात. केस सिल्की, मऊ होण्यास मदत होते.

आता या भांड्यामध्ये १ चमचा मेथी दाणे घाला. मेथी दाण्यांमध्ये निकोटीनिक ॲसिडी आणि इतर बरेच प्रोटीन्स असतात. ज्यांच्यामुळे केस मुळांपासून पक्के होण्यास मदत होते आणि केस गळणं कमी होतं.

यानंतर त्यामध्ये १ चमचा चहा पावडर टाका. स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी चहा पावडर उपयोगी ठरते. यामुळे केसांमध्ये काेंडा होत नाही. तसेच कमी वयात केस पांढरे होऊ नयेत म्हणूनही चहा पावडर उपयुक्त ठरते. आता या तिन्ही पदार्थांमध्ये १ ग्लास पाणी घाला.

७ ते ८ मिनिटे हे पाणी उकळू द्या आणि नंतर गाळून घ्या. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापुर्वी केसांच्या मुळाशी लावा. दुसऱ्यादिवशी लगेचच केस धुण्याची गरज नाही.

आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा. काही दिवसांतच केसांमध्ये खूप छान वाढ झालेली दिसून येईल..