दीप अमावस्या २०२५ : नैवेद्यासाठी करा ६ पारंपरिक पदार्थ ! दिव्यांच्या प्रकाशासोबतच नैवेद्याचे ताट वाढवेल सणाची शोभा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 17:02 IST2025-07-24T11:03:58+5:302025-07-24T17:02:55+5:30

Deep Amavasya Naivedya Recipes : Naivedya ideas for Deep Amavasya : Deep Amavasya special food : Traditional naivedya dishes for Deep Amavasya : दीप अमावस्येला घराघरात वेगवेगळे पदार्थ करुन नैवेद्य दाखवला जातो, त्यातील काही खास पारंपरिक पदार्थ पाहा....

आषाढ महिन्याच्या अखेरीस येणारी (Naivedya ideas for Deep Amavasya) दीप अमावस्या आपल्या घरादाराला (Deep Amavasya Naivedya Recipes) दिव्यांच्या प्रकाशाने अगदी लक्ख उजळवून टाकते. या दिवशी अंगणात रांगोळी, घरभर दिवे, आणि स्वयंपाकघरात नैवेद्यासाठी खास पारंपरिक पदार्थ तयार केले जातात.

दीप अमावस्येला दिवे लावून, देवांची पूजा केली जाते आणि खास पारंपरिक पदार्थांचा (Traditional naivedya dishes for Deep Amavasya) नैवेद्य अर्पण केला जातो. घरातील आई - आजी हमखास दीप अमावस्येला पारंपरिक नैवेद्य करतातच, कोणते पारंपरिक पदार्थ आहेत जे दीप अमावस्येला नैवेद्यासाठी खास तयार केले जातात ते पाहूयात.

मैदा, साखर, दूध, तूप एकत्रित मळून पीठ तयार करा. त्यानंतर लाटून चौकोनी तुकडे करुन तळून घ्या. खमंग, कुरकुरीत गोड शंकरपाळे नैवेद्यासाठी तयार आहेत.

महाराष्ट्रातील बहुतेक सणांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. डाळ व गूळ एकत्रित करुन पुरण तयार करा त्यानंतर मैद्याचे किंवा गव्हाचे पीठ भिजवून कणीक मळून घ्या. कणकेच्या गोळ्यांमध्ये पुरण भरुन पोळ्या लाटून भाजून घ्या. गरमागरम पुरणपोळीवर तुपाची धार सोडा, नैवेद्यासाठी पुरणपोळी तयार आहे.

बेसनाचे घाटले वाफवून त्याची आमटी तयार करतात. घाटले हा श्रावणातील किंवा दीप अमावस्येला केल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे. या आमटीत बेसन, मसाले, चिंच - गुळाची चव अतिशय उत्तम लागते.

आपल्याकडील प्रत्येक सणवाराला नैवेद्यात खिरींचे वेगवेगळे प्रकार केले जातात. साबुदाणा, शेवया, तांदूळ अशा अनेक प्रकारच्या खिरी प्रत्येक घरात हमखास नैवेद्याला केल्या जातात. खीर कोणतीही असो त्यात सुकामेवा, बेदाणे, केशर, वेलदोड्याची पूड घातली की चव अजूनच छान लागते.

किसून घेतलेल्या ओल्या खोबऱ्यात गूळ किंवा साखर मिसळून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार वेलदोड्याची पूड घालून मिश्रण हलकेच परतवून घ्या. या तयार मिश्रणाच्या वड्या थापून घ्या.

आपल्याकडे लाडू हा पदार्थ कोणत्याही सणाचा अविभाज्य भागच आहे. बेसन, रवा किंवा ओल्या नारळाचे लाडू नैवेद्यासाठी तयार केले जातात.