शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पौष्टिक म्हणून ‘या’ भाज्या भरपूर खाणं म्हणजे पोटाच्या आजारांना आमंत्रण, १ चूक पोटाला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 15:10 IST

1 / 6
काही पदार्थ खूप पौष्टिक असले तरी त्यांचा अतिरेक टाळायलाच हवा. कारण तो आपल्या शरीरासाठीच त्रासदायक ठरू शकतो. तसंच काहीसं भाज्यांचंही आहे. काही भाज्या अशा आहेत ज्या पौष्टिक असतात यात वादच नाही. पण तरी मर्यादित स्वरुपातच खायला हव्या. कारण त्यांचा अतिरेक झाला तर निश्चितच त्याचा पचनावर परिणाम होतो.
2 / 6
त्या भाज्या नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती डाॅक्टरांनी dr_mangesh_bondre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यापैकी पहिली भाजी म्हणजे कांदा. कच्चा कांदा प्रत्येकवेळी जेवणात तोंडी लावण्याची सवय अनेकांना असते. पण कांदा वातूळ असतो. यामुळे शरीरातला वात वाढून पोट फुगणे, अपचन असे इतर त्रासही होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून एकदाच एका ठराविक प्रमाणात कांदा तोंडी लावणे ठिक आहे. पण त्याचा अतिरेक मात्र टाळायला हवा.
3 / 6
पत्ताकोबीच्या भाजीचा अतिरेकही टाळायला हवा. हल्ली वेटलॉस करणारे बरेच जण रोजच पत्ताकोबी खातात. पण ती किती प्रमाणात खात आहात हे एकदा तपासून घ्या. तसेच पत्ताकोबी व्यवस्थित शिजल्याशिवाय खाऊ नये. कोशिंबीरद्वारे कच्ची पत्ताकोबी खाणंही पोटासाठी त्रासदायक ठरू शकतं.
4 / 6
पत्ताकोबीप्रमाणचे फुलकोबीमध्येही रॅफिनोज आणि सल्फर हे दोन घटक असतात. त्यामुळे पोटात गॅसेस होणे, पोट फुगणे असे त्रास होतात. त्यामुळे फुलकोबीही व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाऊ नये. आणि तिचा अतिरेक टाळावा.
5 / 6
मटारमधून चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळत असले तर त्याचा अतिरेक टाळायला हवा. रोजच मटार खाऊ नये.
6 / 6
बटाटा लहान मुलांना खूप आवडतो. त्यामुळे एक दिवसाआड बटाट्याची भाजी, बटाट्याचे पराठे मुलांना करून खाऊ घातले जातात. पण हे टाळायला हवं. कारण तो देखील गॅसेस, पोट दुखणे असा त्रास देतो. शिवाय बटाट्याच्या बाबतीतली एक गोष्ट म्हणजे एकदा थंड झाला की तो वारंवार गरम करू नये. तो जास्त त्रासदायक ठरत जातो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नvegetableभाज्याonionकांदा