आरोग्यासाठी अमृत असणारा आवळा कुणासाठी ठरतो घातक, तब्येत बिघडल्याने गाठावा लागतो दवाखाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:32 IST2025-12-17T10:08:48+5:302025-12-17T17:32:49+5:30
Amla Side Effects : आवळा काही सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो असं नाही. काही स्थिती आणि आरोग्य समस्यांमध्ये आवळे खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात कोणत्या लोकांसाठी आवळा खाणं घातक ठरू शकतं हे आज आपण पाहणार आहोत.

Amla Side Effects : आवळ्याला आयुर्वेदात अमृत फळ मानलं जातं. कारण हे फळं टेस्टी तर असतंच, सोबतच आरोग्याला आपण विचारही केला नसेल इतकं फायदे देतं. आवळ्यामध्ये व्हिटामिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. आवळा खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते, पचन सुधारतं, केस आणि त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. पण असं असलं तरी आवळा काही सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो असं नाही. काही स्थिती आणि आरोग्य समस्यांमध्ये आवळे खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात कोणत्या लोकांसाठी आवळा खाणं घातक ठरू शकतं हे आज आपण पाहणार आहोत.

अॅसिडिटी किंवा हायपरअॅसिडिटी
आवळा हे एक आंबट फळ आहे. आवळ्यानं पचन सुधारतं, पण ज्या लोकांना छातीत नेहमीच जळजळ होत असेल, आंबट ढेकर येत असेल किंवा अॅसिड रिफ्लक्सची समस्या असेल अशांची आवळा खाल्ल्याने समस्या अधिक वाढू शकते.

लो ब्लड शुगर
आवळ्याने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. डायबिटीसच्या रूग्णांसाठी आवळा फार गुणकारी ठरतो, पण ज्या लोकांची ब्लड शुगर नॉर्मलपेक्षाही कमी राहते, त्यांना आवळा खाल्ल्यावर कमजोरी, चक्कर आणि थकवा अशा समस्या जाणवू शकतात.

हाय ब्लड प्रेशरचं औषध घेणारे लोक
आवळ्याने ब्लड प्रेशर नॅचरली कमी होतं. जर आपण आधीच हाय बीपीचं औषध घेत असाल आणि आवळाही खात असाल तर ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षाही कमी होऊ शकतं. ज्यामुळे आपल्याला चक्कर, थकवा किंवा बेशुद्ध पडण्याची समस्या होऊ शकते.

रक्त पातळ करण्याचं औषध घेणारे
आवळ्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुण असतात. अशात जर आपण रक्त पातळ करण्यासाठी वॉरफेरिन किंवा अॅस्पिरिनसारखी औषधं घेत असाल आणि आवळाही खात असाल तर रक्त अधिक पातळ होण्याचाही धोका होऊ शकतो.

बद्धकोष्ठतेची समस्या असणारे
आवळा खाल्ल्याने काही लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. आवळ्यातील काही गुणांमुळे आतड्या आणखी कठोर होऊ शकतात. ज्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोट साफ होण्यास समस्या होऊ शकते.

गर्भवती महिला
गर्भावस्थेत आवळे जास्त खाल तर अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यादरम्यान शरीरात आधीच हार्मोनल बदल सेन्सिटीव्ह होतात, अशात आवळे खाल्ल्याने अस्वस्थता जाणवू शकते.

लिव्हरची समस्या असणारे
आवळ्याने लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळते, पण ज्या लोकांचं लिव्हर आधीच कमजोर आहे किंवा लिव्हरसंबंधी समस्या आहे, त्यांसाठी आवळा आणखी समस्या निर्माण करू शकतो.

नव्याने सर्जरी झालेले
सर्जरीनंतर जखम लवकर भरण्यासाठी रक्त घट्ट होणं फार गरजेचं असतं. आवळा रक्त पातळ करतं, ज्यामुळे सर्जरीनंतर ब्लीडिंग वाढू शकतं आणि रिकव्हरीसाठी अधिक वेळ लागू शकतो.

















