प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या या ६ प्रकारच्या ब्रेसियर , आरामदायी आणि सगळ्या साइजसाठी योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 16:48 IST2026-04-03T16:34:34+5:302026-04-03T16:48:27+5:30

These 6 types of brassieres every woman should have, comfortable and suitable for all sizes : ६ प्रकारच्या ब्रेसियर नक्की वापरा.

विविध कपडे, प्रसंग आणि व्यायामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसियर (Bra) उपलब्ध असतात. योग्य प्रकार निवडल्यास आराम, सपोर्ट आणि लूक तिन्ही गोष्टी उत्तम राहतात. प्रत्येकीकडे असायलाच हवे असे काही प्रकार पाहा. योग्य साईज आणि योग्य प्रकार निवडणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीची ब्रा वापरल्यास पाठदुखी, खांदेदुखी किंवा अस्वस्थता होऊ शकते.

ही ब्रा रोजच्या वापरासाठी सर्वात कॉमन आहे. तिचे कप्स स्मूथ आणि सीमलेस असतात, त्यामुळे टी-शर्ट किंवा फिटिंग कपड्यांखाली लाईन्स दिसत नाहीत. आरामदायी आणि नैसर्गिक शेप देणारी आहे.

व्यायाम, जॉगिंग, योगा किंवा जिमसाठी खास डिझाइन केलेली. ही ब्रेस्टला योग्य सपोर्ट देऊन हालचाल कमी करते, त्यामुळे वेदना किंवा सॅगिंग टाळता येते. हाय, मीडियम आणि लो इम्पॅक्ट असे प्रकार असतात.

ही ब्रा ब्रेस्टला वर उचलून थोडा भरदार आणि क्लिव्हेज लूक देते. पार्टीवेअर, डीप नेक किंवा स्पेशल आउटफिटसाठी वापरली जाते.

ऑफ-शोल्डर, ट्यूब टॉप किंवा स्लीव्हलेस ड्रेससाठी योग्य. यामध्ये खांद्यावर पट्टे नसतात आणि सिलिकॉन ग्रिपमुळे ती जागेवर टिकते.

ज्यांना ब्रेस्ट साईज थोडी लहान दिसावी असे वाटते त्यांच्यासाठी. ही ब्रा ब्रेस्टवर हलकासा दाब देते आणि कमी दिसण्यास मदत करते. ऑफिस किंवा फॉर्मल कपड्यांसाठी योग्य.

लाइटवेट, वायरलेस आणि खूपच आरामदायी. यामध्ये कमी पॅडिंग असते आणि हे कॅज्युअल किंवा लाउंजवेअरमध्ये वापरले जाते. काहीवेळा स्टायलिश टॉपसारखेही वापरतात.